Tuesday, April 29, 2025
Homeक्राईम न्यूजमोठी बातमी..! दिशा सालियानच्या वडिलांची उच्च न्यायालयात याचिका; आदित्य ठाकरेंवर केले गंभीर...

मोठी बातमी..! दिशा सालियानच्या वडिलांची उच्च न्यायालयात याचिका; आदित्य ठाकरेंवर केले गंभीर आरोप

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई : दिशा सलियान प्रकरणाशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणाला आता धक्कादायक वळण लागलं आहे. दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यात दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची निघृण हत्या केल्याचा आरोप सतीश सालियान यांनी केला आहे. याची एनआयए चौकशी करावी, अशी मागणीची याचिका सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप

अधिक माहिती अशी की, दिशा सालियानच्या प्रकरणाचा तपास आयपीएस अधिकारी समीर वानखेडे यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या देखरेखे अंतर्गत करण्यात यावा, अशीही मागणी सतीश सालियान यांनी केली आहे. याबरोबरच याचिकेत त्यांनी धक्कादायक आरोप केला आहे. मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करून आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप सतीश सालियान यांनी या याचिकेतून केला आहे.

केलेल्या याचिकेत आरोप करत सतीश सालियान म्हणाले, किशोरी पेडणेकर यांनी आपल्याला नजरकैदेत ठेवून सादर केलेले पुरावे खरे मानायला भाग पाडले. तसंच या याचिकेत शिवसेना नेते आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरिया यांच्यासह मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे तसेच पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी दिशाच्या मृत्यूबाबत जे आरोप केले होते त्यांमध्ये तथ्य असल्याचा दावा या याचिकेतून सतीश सालियान यांनी केला आहे. त्यामुळे दिशा सालियान प्रकरणाला आता वेगळे वळण मिळणार की काय? याची चर्चा सर्वत्र होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments