Tuesday, December 3, 2024
Homeक्राईम न्यूजमोठी बातमी ! एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा दिला राजीनामा....

मोठी बातमी ! एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा दिला राजीनामा….

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द केला आहे. आज एकनाथ शिंदे यांनी राजभवनात दाखल होत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सादर केला. यावेळी देवेंद्र फडणवीस, अजित पवार, दीपक केसरकर दादाजी भुसे आणि चंद्रकांत रघुवंशी हेदेखी उपस्थित होते.

14 व्या विधानसभेची मुदत आज 26 तारखेला संपत असल्यामुळे आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे हे नवीन सरकार स्थापन होईपर्यंत राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असणार आहेत. महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री कोण होणार यासाठी तिन्ही नेते दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला. यात भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या.

राजीनामा देण्याआधी एकनाथ शिंदे काय म्हणाले?

महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो. पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील, असं द्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments