इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : नुकताच राज्यातील महानगरपालिकां संबंधितचा ‘ई गव्हर्नन्स निर्देशांक’ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये पुणे महानगर पालिकेने प्रथम क्रमांक मिळवला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेने दूसरा तर, पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेने तृतीय क्रमांक मिळवला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पॉलिसी रीसर्च ऑर्गनायझेशनने हा निर्देशांक तयार केला आहे. या मध्ये सेवा, पारदर्शकता, उपलब्धता हे तीन मुख्य निकष, संकेतस्थळ, समाजमाध्यम, मोबाइल अॅप्लिकेशन्स, ही तीन माध्यमे आणि काही उपनिकष अशा एकूण १०१ निकषांवर महानगरपालिकांचे मूल्यमापन करण्यात आले आहे.
पॉलिसी रीसर्च ऑर्गनायझेशनने गतवर्षी १ नोव्हेंबर पासून ३१ डिसेंबर २०२४ पर्यंतच्या कालावधीत महापालिकांचे मोबाइल अॅप्लिकेशन्स संकेतस्थळ, आणि समाजमाध्यमे यांचा अभ्यास करून इंडेक्स तयार करण्यात आला आहे. हा अहवाल तयार करण्यात नेहा महाजन यांच्या नेतृत्वाखालील अभ्यास गट नेमलेला होता त्यात श्वेता शहा, अनुजा सुरवसे, मनोज जोशी, गौरव देशपांडे यांचा समावेश होता.
हा अहवाल प्रसिद्ध होऊ लागल्यापासून महानगरपालिकांच्या ई-शासन कारभारामध्ये सुधारणा होऊ लागल्याचे दिसून येत आहे. महापालिकांच्या ई-शासन करभारात कार्यपद्धती ठरवणे महत्वाचे आहे. यामुळे संबंधित अधिकाऱ्याची बदली झाली, तरी त्याचा कामावर काहीही परिणाम होणार नाही, असे पॉलिसी रीसर्च ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष तन्मय कानिटकर यांचे म्हणणे आहे. पॉलिसी रीसर्च ऑर्गनायझेशनचा हा अहवाल https://policyresearch.in/ या लिंक वर उपलब्ध आहे.