Wednesday, November 29, 2023
Home क्राईम न्यूज मोठी अपडेट, एकाच फोनमध्ये वापरा दोन व्हॉट्सअप

मोठी अपडेट, एकाच फोनमध्ये वापरा दोन व्हॉट्सअप

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नवी दिल्ली | 20 ऑक्टोबर 2023: Whatsapp वापरकर्त्यांसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. लवकरच ते एकावेळी दोन व्हॉट्सअप खाती लॉग इन करु शकतील. व्हॉट्सअपनेच गुरुवारी ही महत्वाची अपडेट दिली आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्गने या नवीन घडामोडींची माहिती दिली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी याविषयीची पोस्ट लिहिली. व्हॉट्सअपला दोन खात्यात स्वीच करता येईल, असे त्यांनी जाहीर केले. लवकरच व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला दोन व्हॉट्सअप खाती हाताळता येतील. त्यासाठी काही बदल करावे लागतील सेटिंगमध्ये लवकरच याविषयीचे अपडेट होतील. त्यानंतर युझर्सला त्याचा वापर करता येईल.

युझर्सचा होईल फायदा

‘आता तुम्हाला प्रत्येकवेळी लॉग आऊट करण्याची, दोन मोबाईल खरेदी करण्याची वा चुकीच्या ठिकाणी मॅसेज जाण्याची भीती राहणार नाही. तसेच कोणत्याही ठिकाणचा मॅसेज एकाच ठिकाणी वाचण्याची सुविधा मिळणार आहे.’ अशी माहिती मेटाने दिली आहे. दुसरे खाते तयार करण्यासाठी दुसरा मोबाईल क्रमांक, दोन सिम कार्डचा मोबाईल, मल्टी-सिम वा ईसिमची गरज असेल.

कसे जोडणार दुसरे खाते

• एकाचवेळी दोन व्हॉट्सअप वापरण्यासाठी बदल करावा लागले

• व्हॉट्सअप सेटिंग्जमध्ये हा बदल करता येईल व्हॉट्सअप सेटिंग्ज उघडून एड अकाऊंट हा पर्याय निवडा

याठिकाणी दुसऱ्या क्रमांकावरुन खाते जोडता येईल खाते जोडण्यासाठी अधिकृत एपचाच वापर करा

• कोणत्याही दुसऱ्या सेटिंग्जचा वा शॉर्टकटचा वापर करणे धोक्याचे असेल

आता एसएमएस प्रमाणिकरणाची गरज नाही

व्हॉट्सअपने या आठवड्याच्या सुरुवातीला वापरकर्त्यांना आणखी एक सुविधा दिली आहे. त्यानुसार, अँड्रॉईड वापरकर्त्यांना एसएमएस प्रमाणिकरणाची गरज नाही. Android युझर्स Passkey सह सहज आणि सुरक्षितपणे लॉग इन करू शकतात युझर्स त्यांचा चेहरा, बोटांचा ठसा वा पिन आधारे त्यांचे व्हॉट्सअप खाते अनलॉक करु शकतात, असे मेटाने सोशल मीडिया पोस्टमधून स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments