Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज मोटारसायकल चोरट्यांकडून ८ लाख रुपयांच्या दुचाकी ताब्यात; चाकण पोलिसांची कारवाई

मोटारसायकल चोरट्यांकडून ८ लाख रुपयांच्या दुचाकी ताब्यात; चाकण पोलिसांची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

चाकण : चाकण परिसरातून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलिसांविषयी नागरिकांचा अविश्वास बळावत चालला होता. यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिलेल्या आदेशानुसार चाकण पोलीसांनी दणकेबाज कारवाई करत दोन मोटार सायकल चोरट्यांना ताब्यात घेतले आहे.

योगेश तुकाराम देवकर (वय. ३० वर्षे) दत्तात्रय गंगाराम गाडेबैल (वय.२६ वर्षे, दोन्ही रा. कवठे यमाई ता. शिरूर जि. पुणे) यांना चाकण पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून आठ लाख रुपये किमंतीच्या एकुण १५ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण शहरात पार्किंग केलेल्या मोटारसायकल चोरीच्या प्रमाणात वाढ झाल्याने चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड आणि विक्रम गायकवाड यांच्या पथकाने वाहन चोरीच्या घटनास्थळाच्या परिसरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच सदर मोबाईलचा तांत्रिक विश्लेषन तपास करून घटनास्थळी दिसलेल्या इसमांबाबत माहिती प्राप्त करून, चाकण पोलीस पथकाने मोटार सायकल चोरी करणारे योगेश देवकर व दत्तात्रय गाडेबैल या दोघांना कवठे यमाई येथे सापळा रचुन ताब्यात घेतले. चोरट्यांनी चाकण पोलीस ठाणे व इतर पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केलेल्या एकुण १५ मोटार सायकली ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत.

चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक युनुस मुलाणी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, विक्रम गायकवाड, संदिप सोनवणे, राजु जाधव, हनुमंत कांबळे, निखील शेटे, नितीन गुंजाळ, सुनिल भागवत, संदिप गंगावणे, अशोक दिवटे, महेश कोळी, विवेक सानप, प्रतिक चव्हाण, अरुण शिंदे, महादेव बिक्कड, माधुरी कचाटे यांनी वरील कारवाई केलेली आहे.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments