Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजमॉलच्या करआकारणीवर हरकत; २५ लाख रुपयांचा धनादेश जमा

मॉलच्या करआकारणीवर हरकत; २५ लाख रुपयांचा धनादेश जमा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाच्या नावाने असलेल्या इमारतीच्या मिळकतकराची थकबाकी न भरल्याने पुणे महापालिकेने ही इमारत सील केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. बुधवारी (ता. २८) संबंधितांकडून महापालिकेला २५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला असून, या थकबाकीवर आक्षेप घेण्यात आल्याने पुणे महापालिकेने यावर सुनावणी घेण्याचे ठरविले आहे.

डेक्कन जिमखाना येथील एक मॉल केंद्रीय मंत्री व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर आहे. महापालिकेच्या मिळकतकराच्या बिलावर देखील त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींची नावे आहेत. तरीही महापालिकेने बुधवारी हा मॉल केंद्रीय मंत्री व त्यांच्याशी संबंधित व्यक्तीचा नसल्याचा चक्क लेखी खुलासा केला आहे. दरम्यान, या मॉलच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याची तीन कोटी ७७ लाख रुपये इतकी थकबाकी होती. त्यामुळे ही मिळकत सील केली होती.

डेक्कन येथील मॉलने २५ लाखांचा धनादेश दिलेला आहे. थकबाकीबाबत संबंधितांचे आक्षेप असून त्यावर सुनावणी घेऊन योग्य ती कर आकारणी केली जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments