Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजमॉर्फ फोटोच्या माध्यमातून तरुणीला ब्लॅकमेल: 34 तोळे सोने लुटणारा पुण्यात अटकेत

मॉर्फ फोटोच्या माध्यमातून तरुणीला ब्लॅकमेल: 34 तोळे सोने लुटणारा पुण्यात अटकेत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

• सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेली फसवणूक उघड, भेटण्यासाठी बोलावून तयार केले होते फोटो

एका मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणीला सोशल मीडियावर सूरज जैन या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून आरोपी तिला आपण मोठ्या उद्योगपती घराण्यातील मुलगा असल्याचे भासवत होता. अशा भूलथापा देऊन त्याने तिच्याशी मैत्रीचे संबंध निर्माण केले. तिला बाहेर भेटण्यास बोलावले. या भेटीतले फोटो अक्षेपार्हरीत्या मॉर्फ करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून ३४ तोळे सोन्याचे दागिने अारोपीने घेतले होते. तरुणीच्या तक्रारीनंतर निगडी पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करून सोनेही जप्त केले.

सूरज लक्ष्मण परमार ऊर्फ सूरज जैन ऊर्फ सुरेश भिवशी कदम ऊर्फ द्रिश मालपाणी (२८, रा. सय्यदनगर, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर निगडी पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात अालेला अाहे.

तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, तिची व अारोपीची सोशल मीडियाच्या माध्यमातून अओळख झाली. तरुणाला भेटल्यावर त्याने अाक्षेपार्ह फोटो मॉर्फ करुन ब्लॅकमेलिंग सुरु केले. तिच्याकडून ३४ तोळे सोने घेतले. अारोपी तिच्याकडे सतत अाणखी सोन्याचे दागिने देण्याची मागणी करत होता.

तरुणीने सोने देण्यास नकार दिल्याने अारोपीने तिचे सोशल मीडिया आयडी स्वतःचे मोबाइलमध्ये सुरु करुन त्यावरुन मॉर्फ केलेले फोटो पोस्ट केले. त्यामुळे तरुणीने निगडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक शत्रुघ्न माळी, पोलिस निरीक्षक (गुन्हे) तेजस्विनी कदम यांनी तपास सुरु केला. तांत्रिक विशलेषण करुन अारोपीची अोळख पटवली. सलग तीन दिवस सय्यदनगर, हडपसर, पुणे परिसरात सापळा रचून अारोपी सुरज लक्ष्मण परमार ऊर्फ सुरज जैन यास अटक केली. त्याने त्याच्या मैत्रिणीच्या नावाने विक्री केलेले पीडित तरुणीचे ३४ तोळे सोन्याचे दागिने व अारोपीने मॉर्फ केलेले फोटो हस्तगत करण्यात अाले अाहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments