इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
ठाणे: ठाण्यातील कासार वाडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कासार वाडवली येथील एका तरुणाने आपल्या मित्राच्या कानाचा चावा घेतल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कासार वडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे येथील कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीडित तरुणाची एक मैत्रीण राहते. काही दिवसांपूर्वी या मैत्रीणीची एक शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे २५ फेब्रुवारीला पीडित तरुण आपल्या मैत्रिणीची विचारपूस करण्यासाठी तिच्या घरी आला असता त्याच इमारतीत राहणाऱ्या आपल्या एका मित्रालाही मैत्रिणीच्या घरी त्याने बोलावून घेतलं होतं.
त्यानंतर तिघांमध्ये गप्पा रंगल्या. दरम्यान, बोलत असताना एका क्षुल्लक कारणातून पीडित तरुणाचा आणि मैत्रिणीच्या इमारतीत राहणाऱ्या मित्राचा वाद झाला. तोंड्याच वेळातहा वाद विकोपाला गेला. त्यानंतर मैत्रिणीच्या इमारतीत राहणाऱ्या मित्राने भेटायला आलेल्या मित्राच्या कानाचा जबर चावा घेतला. या चाव्यामुळे तरुणाचा कान तुटल्याने मोठ्या प्रमाणात रक्त स्त्राव होत होता. जमखी तरुणाला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.
या घटनेनंतर पीडित तरुणाने कासारवडवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी विविध कलमांतर्गत आरोपी मित्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस वाद का झाला? याचा तपास करत आहेत.