Saturday, February 15, 2025
Homeक्राईम न्यूजमेट्रो व महापारेषणच्या अत्यावश्यक विद्युत कामांसाठी शिवाजीनगर, डेक्कन भागात गुरुवारी वीजपुरवठा बंद...

मेट्रो व महापारेषणच्या अत्यावश्यक विद्युत कामांसाठी शिवाजीनगर, डेक्कन भागात गुरुवारी वीजपुरवठा बंद राहणार..

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावरील पुणे मेट्रो व महापारेषणच्या अतिउच्चदाब वीजवाहिन्यांच्या अत्यावश्यक कामांसाठी महापारेषणच्या तीन अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर आणि डेक्कन परिसरातील महावितरणच्या उपकेंद्रांचा वीजपुरवठा गुरुवारी (दि. ६) सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.

शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावर मेट्रोचे काम सुरु असून या मार्गावरील महापारेषणच्या १३२ केव्ही भूमिगत वीजवाहिन्यांचे काम करण्यात येत आहे. मात्र त्यासाठी २२०/१३२ केव्ही गणेशखिंड व चिंचवड अतिउच्चदाब उपकेंद्र आणि कोथरूडमधील जीकेआरएस उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे.

या परिसरातील वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार..

लागत असल्याने गणेशखिंड, मॉडेल कॉलनी, दीप बंगला परिसर, वडारवाडी, गोखलेनगर, जनता वसाहत, एमआयजी कॉलनी, वैदूवाडी, जनवाडी, वेताळबाबा चौक, मंगलवाडी, सेनापती बापट मार्ग, रमणबाग चौक, न्यू मराठी स्कूल, नारायणपेठ, शिवाजीनगर गावठाण, जंगली महाराज रोड, रोकडोबा मंदिर परिसर, लक्ष्मी रोड, कुमठेकर चौक, पोलीस लाईन वसाहत, घोले रोड, मॉडर्न कॉलेज, विजय टॉकीज, रेवेन्यू कॉलनी, सिमला ऑफीस, आकाशवाणी, जिल्हा न्यायालय, कामगार पुतळा, मेट्रो स्टेशन, संचेती हॉस्पिटल, ठुबे पार्क, औंध गाव, सिद्धार्थ नगर, परिहार चौक, ब्रेमेन चौक, संघवी रोड, ओम सुपर मार्केट, थोरात चौक, वाकडेवाडी.

साखर संकुल रोड, चाफेकरनगर, आकाशवाणी कॉलनी, राहुल थिएटर, खैरेवाडी, दळवी हॉस्पिटल, अशोकनगर, रेंज हिल्स रोड, काकडे मॉल, एबीआयएल, मोदीबाग, चव्हाणनगर तसेच आपटे रोड, रुपाली गल्ली, शिरोळे रोड, घोले रोड, पुलाची वाडी, संभाजी गार्डन, एफसी रोड, वैशाली हॉटेल, सुतारदरा, शिवतिर्थनगर, साम्राज्यनगर, शिक्षकनगर, जयभवानीनगर, किष्किंधानगर या परिसरातील वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. वीज बंदबाबत संबंधित ग्राहकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर महावितरणकडून कळविण्यात आले आहे. या कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मेट्रो, महापारेषण व महावितरणकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments