Friday, April 19, 2024
Homeक्राईम न्यूजमेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक...

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. रस्त्यावर पडलेले खड्डे, दुरुस्तीची कामे किती दिवसांत पूर्ण करणार, असा प्रश्न त्यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना विचारला. हे काम पूर्ण सुरळीत होईपर्यंत कोणीही घरी जाणार नाही, अशा शब्दांत त्यांनी सुनावले. पोलिस आयुक्तांचा चढलेला पारा बघून अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली.

विद्यापीठासमोरील आचार्य आनंदऋषिजी महाराज चौकात हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो आणि दुमजली उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. परंतु संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे चौकात दररोज वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

ज्या भागातील मेट्रोचे काम पूर्ण झालेले आहे, तेथून बॅरिकेड काढून घ्यावेत, अशा सूचना वाहतूक शाखेकडून करण्यात येतात. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते. या भागातील रस्त्यावर खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. कोंडीबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. त्याची दखल घेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी चौकात पाहणी केली. मात्र कोंडी पाहून त्यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली.

ही कामे किती दिवसांत पूर्ण करणार?

हे काम पूर्ण सुरळीत होईपर्यंत कोणीही घरी जाणार नाही. आमच्या संयमाचा अंत पाहू नका. जे शक्य आहे ते सर्व करा, अशा शब्दांत अमितेश कुमार यांनी सुनावले. अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त (वाहतूक) शशिकांत बोराटे यांच्यासह मेट्रो आणि महापालिकेचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments