इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिबवेवाडी परिसरात एका २५ वर्षीय डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ज्या तरुणासोबत लग्न करायचं होतं त्या तरुणाने लग्नास नकार दिल्यामुळे पीडित डॉक्टरने विषारी औषध पिऊन आयुष्य संपवलं आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
या प्रकरणाबाबत अधिकची माहिती अशी की, पल्लवी पोपट फडतरे असं आत्महत्या केलेल्या २५ वर्षीय महिला डॉक्टरचे नाव आहे. तर कुलदीप आदिनाथ सावंत असे आरोपी तरुणाचं नाव आहे. आरोपी कुलदीप हा विवाहित होता. तरीदेखील मेट्रीमोनियल संकेतस्थळ जीवनसाथी डॉट कॉमवर त्याने नोंदणी केली होती. या वेबसाईटच्या द्वारे त्याने पीडितेशी संपर्क साधल्याच समोर आलं आहे. याच बरोबर मी आपल्याची लग्नासाठी इच्छुक असल्याचं आरोपीनं पीडितेला सांगितलं होतं.
पीडित डॉक्टर तरुणीकडून घेतलेले दहा लाख रुपये देण्यास नकार
मिळालेल्या माहितीनुसार, वेबसाईटवरून दोघांची ओळख झाल्यानंतर सुरुवातीला महिला डॉक्टरने कुलदीप सोबत लग्न करण्यास नकार दिला. मात्र आरोपीनं पीडित डॉक्टरशी वारंवार संपर्क साधून तिचा विश्वास संपादन केला. मला तुमच्याशी लग्न करायचे आहे असे सांगून पीडित डॉक्टर कडून दहा लाख रुपये घेतले. त्यानंतर तरुणीने जेंव्हा आरोपी कुलदीपकडे लग्नासाठी विचारणा केली, तेव्हा आरोपीनं उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केली. शेवटी आपण विवाहित असून पत्नी गर्भवती असल्याचं आरोपी कुलदीपने पीडितेला सांगितलं. कुलदीपची हि पार्श्वभूमी समजल्यानंतर पीडित तरुणीला मानसिक आघात झाला. त्यानंतर तिने दिलेले दहा लाख रुपये परत मागितले असता आरोपीने ते परत देण्यास नकार दिला.
यातून पीडित डॉक्टर तरुणीने क्लिनिकमध्ये विषारी औषध पिऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी आता पीडित तरुणीच्या वडिलांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात आरोपी कुलदीप विरोधी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.