Thursday, June 13, 2024
Homeक्राईम न्यूज'मृत' महिलेच्या अंगावरील दागिने 'चोरले'...! 'सिसिटीव्ही'ने मात्र 'हेरले'; आरोपीला ठोकल्या बेड्या

‘मृत’ महिलेच्या अंगावरील दागिने ‘चोरले’…! ‘सिसिटीव्ही’ने मात्र ‘हेरले’; आरोपीला ठोकल्या बेड्या

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पाटस, (पुणे) : दौंड तालुक्यातील वरवंड येथील ८० वर्षीय मृत महिलेच्या अंगावरील दागिन्यांची चोरी केल्या प्रकरणी संशयित आरोपीला यवत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शुभम हिरामण पंडीत (वय २४, रा. वरवंड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

सुशीला मारुती केदारी (वय ८०, रा. वरवंड) असे मृत महिलेचे नाव असून त्यांच्या अंगावरील दागिन्यांची चोरी केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याबाबत त्यांचे नातेवाईक संतोष दगडू मनोचार्य (वय ५३, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरवंड येथील विठ्ठल मंदिराजवळ राहणाऱ्या सुशीला केदारी या २५ मे रोजी राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आल्या. त्या वेळी त्यांच्या अंगावर सोन्याचे दागिने नसल्याचे नातेवाइकांच्या निदर्शनास आले होते. याप्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर वरवंड गावातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहिती घेतली.

त्या माहितीच्या आधारे ही चोरी शुभमने केल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी शुभमला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments