Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजमुळशीत मुठा गावात थरार! कुख्यात गुंड व पोलीसांत चकमक; सिनेस्टाईल पाठलाग करून...

मुळशीत मुठा गावात थरार! कुख्यात गुंड व पोलीसांत चकमक; सिनेस्टाईल पाठलाग करून गुंड नवनाथ वाडकरला अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुण्यात गुन्हेगारीच्या आणि गोळीबाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. गेल्या आठवड्यात गोळीबाराच्या चार घटना घडल्या असून आता गुन्हेगारांनी पोलीसांवरच गोळीबार केल्याची घटना घडली. पोलिसांनी देखील त्याला बंदुकीनेच उत्तर देत त्याचा सिनेस्टाईल पाठलाग करत त्याला बेड्या ठोकल्या. ही थरारक घटना मुळशी तालुक्यातील मुठा गावात मंगळवारी घडली. पुण्यातील जनता वसाहतीतील अट्टल गुन्हेगार नवनाथ उर्फ नव्या निलेश वाडकर (वय १८ रा. जनता वसाहत, पर्वती) आणि केतन साळुंखे अशी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराची नावे आहेत. पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली.

नवनाथ वाडकर हा सराईत गुंड आहे. त्याच्यावर खंडणी, खुनाचा प्रयत्न, दरोडा या सारखे गुन्हे दाखल आहे. तो गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार होता. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

नवनाथ वाडकरवर व त्याच्या साथीदारांच्या शोधत पोलिस गेल्या काही दिवसांपासून होते. मात्र, तो सापडत नव्हता. दरम्यान, नवनाथ हा मुळशी तालुक्यातील मुठा गावात लपला असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला गुप्त बातमीदारांकडून मिळाली. पोलिसांनी तातडीने पथकाची स्थापना करत त्याचा पकडण्यासाठी रवाना केले. ही पथक मुळशी तालुक्यात पोहचले असता वाडकरला पोलिसांची चाहूल लागली. यामुळे त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा सिनेस्टाईल पाठलाग सुरू केला. पोलीस पाठलाग करत असल्याचे पाहून वाडकरने पोलिसांच्या दिशेने एक गोळी झाडली. तब्बल दोन ते तीन गोळ्या त्याने पोलिसांच्या दिशेने झाडल्या. दरम्यान, पोलिसांनीही स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तरादाखल वाडकरच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. यानंतर त्याच्या दुचाकीचा पाठलाग करून भरधाव वेगात जात त्याच्या दुचाकीला गाडी आडवी घालून पोलिसांनी त्याला त्याच्या साथीदारासह मुठा गावाजवळ अटक केली.

दोघेही आरोपी अट्टल गुंड

नवनाथ वाडकर हा अट्टल गुंड आहे. त्याच्यावर सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. या दारोड्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, वाडकर हा फरार झाला होता. तेव्हापासून तेव्हापासून खंडणी विरोधी पथक वाडकर याचा शोध घेत होते. वाडकर हा मुठा परिसरात पिस्तूल घेऊन लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर हा सर्व थरार झाला.

पोलिसांवर केला गोळीबार

पोलिसांनी आरोपींचा एनडीए रस्ता येथे वाडकर हा त्याच्या साथीदारासह जातांना दिसला. पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरु केला. पोलिस मागे असल्याचे पाहून वाडकरने पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी देखील त्याला चोख उत्तर देत त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. यानंतर गाडी त्याच्या दुचाकीला आडवी घालून दोघांनाही अटक करण्यात आली.

पुण्याच्या जनता वसाहतीत वाडकर टोळीची दहशत

पुण्याच्या पार्वती दर्शन आणि जनता वसाहतीत निलेश वाडकर आणि चॉकलेट सुन्या या दोन टोळ्यांची दहशत आहे. या दोन्ही टोळ्यात मोठे वाद आहेत. त्यामुळे यांच्यात खटके उडाले आहेत. चॉकलेट सुन्याच्या टोळीने २०१८ मध्ये निलेश वाडकर याचा पर्वती पायथा येथे खून केला होता. या प्रकरणात चॉकलेट सुन्यासह २२ जणांना पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी चॉकलेट सुन्या व त्याच्या टोळीतील साथीदारांविरुद्ध मोका लावला होता. निलेश वाडकरचा मुलगा नवनाथ हा अल्पवयीन असून वडिलांच्या खुनाचा बदला घेण्याची शपथ त्याने घेतली होती. यानंतर वाडकरने चॉकलेट सुन्याच्या भावाचा खून केला. नवनाथ हा अल्पवयीन असताना त्याने दोघांच्या खून करण्याचा प्रयत्न केला. नवनाथचा साथीदार केतन साळुंखेवर स्वारगेट पोलीस ठाण्यात पत्रकारावरील हल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments