Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजमुलीने मित्राच्या मदतीने केला आईचा खूनः बँकेतील पैसे काढल्याचे समजल्यास आई रागावेल...

मुलीने मित्राच्या मदतीने केला आईचा खूनः बँकेतील पैसे काढल्याचे समजल्यास आई रागावेल म्हणून केले गैरकृत्य, पुण्यातील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता) 

वडगाव शेरी भागात मुलीने मित्राच्या मदतीने जन्मदात्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर मुलीने आपल्या आईचा स्वच्छतागृहात पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याचा बनाव रचला होता. परंतु मुंबईतील नातेवाइकाने तक्रार दिल्यानंतर पोलिस तपासात खुनाचा हा प्रकार उघडकीस आला.

मंगला संजय गोखले (45, राजश्री कॉलनी, वडगाव शेरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत मृत महिलेचे नातेवाईक विनोद शाहू गाडे (42, रा. गोवंडी, मुंबई) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून मुलीसह तिच्या मित्राविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यश मिलिंद शितोळे (रा. गणेशनगर, वडगावशेरी) आणि योशिता संजय गोखले (18, रा. राजश्री कॉलनी, वडगाव शेरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगल गोखले यांच्या बँक खात्यातून मुलीने मित्राच्या मदतीने परस्पर अडीच लाख रुपये काढले होते. ही बाब आईला समजल्यानंतर ती रागावेल, अशी भीती तिला वाटत होती. त्यामुळे तिने आपल्या मित्राच्या मदतीने आईचा खून करण्याचा कट आखला. तिने आई झोपेत असताना आपल्या यश नामक मित्राला घरी बोलावले. योशिताने यशला घरातील हातोडा दिला. त्यानंतर या दोघांनी मंगल यांच्या डोक्यात हातोडा मारून त्यांना ठार मारले. आरोपी यशने मंगल यांच्या डोक्यात हातोड्याने वार करून जखमी केले. तर मुलगी योशिताने आईचे स्कार्फने तोंड दाबून धरले. हा प्रकार कोणाला कळू नये, यासाठी आई पाय घसरून पडल्याने तिच्या डोक्याला दुखापत झाल्याचा बनाव रचला.

….असा केला खून

फिर्यादी आपला मुलगा प्रणयवर रागावले होते. त्यानंतर तो मंगला यांच्या घरी रहायला आला होता. यावेळी मंगला यांनी योशिताला उद्या बँकेतून पैसे काढून आण असे सांगितले होते. मात्र योशिताने अगोदरच यशसोबत बँकेतून सर्व पैसे काढून ते खर्च केले होते. ही बाब आईला समजल्यावर ती खूप रागावेल अशी भिती तिने मित्र यश सोबत बोलून दाखवली. यावर यशने आईचा खून केल्यास सर्व प्रश्न सुटतील असे सांगत कट रचला. मात्र घरात आई सोबत प्रणय झोपत असल्याचे तिने सांगितले. यावर यशने त्याला मध्यरात्री काही कारणाने बाहेर बोलावून घेऊ असे सांगितले.

त्यानुसार मध्यरात्री योशिताने प्रणयला यशने बोलावले असल्याचे सांगत त्याच्यासोबत बाहेर पाठवून दिले. यानंतर यशने प्रणयला एका ठिकाणी काही बहाण्याने थांबवून ठेवले आणि यश पुन्हा योशिताच्या घरी आला. त्याने मंगला यांच्या डोक्यावर हातोडा मारुन खून केला. यानंतर यश घराबाहेर पडून प्रणयला घेऊन घरी आला. प्रणयला मंगला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्याने विचारणा केल्यावर आई स्वच्छतागृहातमध्ये पाय घसरुण पडल्याचे योशिताने सांगितले. यानंतर यशने रुग्णवाहिका बोलावून मंगला यांना ससून रुग्णालयात दाखल केले. तेथे ही डॉक्टरांना तीच थाप मारण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments