Tuesday, December 3, 2024
HomeUncategorizedमुलांची परीक्षा फी भरणं पडलं महागात..; कसबा मतदारसंघातील 'त्या' उमेदवाराला आयोगानं बजावली...

मुलांची परीक्षा फी भरणं पडलं महागात..; कसबा मतदारसंघातील ‘त्या’ उमेदवाराला आयोगानं बजावली नोटीस; नेमकं काय घडलं

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : विधानसभा निवडणुकीचा प्रचाराणे चांगलाच रंग पकडला आहे. मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवार जोरदार प्रयत्न करत आहेत, पण आचारसंहिता असल्यामुळे अनेक जण अडचणीत सुद्धा येतांना दिसत आहेत. असाच एक उमेदवार अडचणीत आल्याचे समोर आले आहे. पुण्यातील मनसे उमेदवार एका मुलांची परीक्षा फी भरल्यामुळे अडचणीत आले आहेत. निवडणूक आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मनसेचे कसबा पेठचे उमेदवार गणेश भोकरे यांना आयोगाने नोटीस पाठवली आहे. त्यामुळे पुण्यात याबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे.

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार गणेश भोकरे यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नोटीस पाठवली आहे. गणेश भोकरे यांनी मतदारसंघातील मुलांची परीक्षेची फी भरली, म्हणून त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली असल्याचे समोर येत आहे. निवडणुकीच्या काळात तुम्ही अशा पद्धतीने फी भरू शकत नाहीत. असं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

फी भरून जर मी काही चूक केली असेल, तर असे अनेक गुन्हे मी अंगावर घ्यायला तयार आहे..’ असे भोकरे यांनी म्हटले आहे. जी लोक काम करत नाहीत त्यांच्यावर कुठले गुन्हे नसतात, मी काम करतो तर माझ्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेत. मी असे अनेक गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहे, असे भोकरे यांनी सांगितले. पुण्यातील एसएसपीएम या शाळेमध्ये पात्रे भाऊ शिकतात. एक आठवीला आणि एक नववीला आहे. शाळेने त्यांना 75 हजार रुपये फी भरा असं सांगितलं होतं. मात्र घरची परिस्थिती नसल्याने ते फी भरू शकत नव्हते.

शाळेने त्यांना शाळेतून फी भरण्याचा तगादा लावला होता. पात्रे यांनी मनसेचे उमेदवार गणेश भोकरे यांची भेट घेतली व सर्व परिस्थिती सांगितली. यावेळी गणेश भोकरे हे मुलांना घेऊन शाळेत गेले व शाळेला दोन्ही मुलांचे वीस हजार रुपये फी भरली. शाळेची फी भरली म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने गणेश भोकरे यांना हा खर्च निवडणूक खर्चात धरला जाणारा आहे, याबाबतची नोटीस पाठवली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments