Saturday, March 15, 2025
Homeक्राईम न्यूजमुख्यमंत्र्यांचे धक्कातंत्र; एकनाथ शिंदेंच्या मित्राची महत्त्वाच्या पदावरून उचलबांगडी

मुख्यमंत्र्यांचे धक्कातंत्र; एकनाथ शिंदेंच्या मित्राची महत्त्वाच्या पदावरून उचलबांगडी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील शीतयुद्धाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. अशातच आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकनाथ शिंदें यांच्या मित्राची महत्त्वाच्या पदावरून उचलबांगडी केली असल्याने एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र इन्फॉर्मेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन संस्था (मित्र) या आयोगाच्या उपाध्यक्षपदी बिल्डर अजय अशर यांची नियुक्ती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र, आता मुख्यमंत्र्यांनी अजय अशर यांना संस्थेच्या नियमित मंडळावरून हटवले असल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिंदे यांच्या कार्यकाळातील काही महत्त्वाचे निर्णय बदलले जात आहेत. या पार्श्वभूमीवरच एकनाथ शिंदे यांनी नियुक्ती केलेल्या मित्र संस्थेच्या नियमित मंडळातून अजय अशर यांना हटवण्यात आले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान अजय अशर हे ठाण्यातील प्रसिद्ध बिल्डर असून एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या किसननगर मतदारसंघात त्यांनी अनेक प्रकल्प उभारले आहेत. काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज शिंदे यांचे अशर मित्र होते, मात्र 2000 नंतर एकनाथ शिंदेंशी त्यांनीं जवळीक वाढवली. दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे शिंदे सभागृह नेतेपदी पोहचले त्याच काळात अशर यांनी त्यांच्यासोबत कनिष्ठ संबंध प्रस्थापित केले.

दरम्यान मित्र संस्थेच्या नियमित मंडळातून मुख्यमंत्र्यांनी अजय अशर यांना हटवल्यानंतर त्यांच्या जागी दिलीप वळसे पाटील, राणा जगजीतसिंह पाटील आणि राजेश क्षीरसागर यांची नव्याने मित्र संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसेच मुख्य सचिवांसह इतर महत्त्वाच्या सिंचन संचालक पदासाठी ही नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. हा बदल एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात असून या निर्णयाने महायुतीत ठिणगी पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments