इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
केडगाव (पुणे) : राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा शुभारंभ जुलै महिन्यात केला आहे. या योजनेपासून एकही पात्र लाभार्थी महिला वंचित राहणार नाही. या योजनेत 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्व महिला अर्ज करू शकणार आहेत. अर्ज भरणाऱ्यासाठी ऑनलाईन नारी शक्ती दुत अॅप तसेच ऑफलाईन पद्धतीने अंगणवाडी सेविका, आशावर्कर्स, ग्रामपंचायत, आपले सरकार सेवा केंद्र याठिकाणी देखील जमा करता येणार आहेत. लाभ मिळविण्यासाठी जास्तीत जास्त पात्र महिलांनी या योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत, असे आवाहन दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी केले.
राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यात पावणेदहा लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. तर दौंड तालुक्यात 52,040 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 49528 अर्जना अप्रुवल मिळाले आहे. तर 2332 अर्जामध्ये दुरुस्ती करावी लागणार आहे. तसेच 159 अर्ज रिजेक्ट केलेले आहेत, अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी कणाल धमाळ यांनी दिली.
जर तुम्ही तुमच्या स्वतः च्या मोबाईल वरून फॉर्म भरला असेल तर तुम्हाला स्वतः तुमचा अर्ज एडिट करता येईल. पण जर तुम्ही दुसऱ्या कोणा कडून अर्ज भरून घेतला असेल, तर तुम्हाला त्या व्यक्तीला याची विचारणा करावी लागेल. फॉर्म भरताना जर तुमचा ओटीपी आला नसेल, किंवा मोबाईल नंबर चुकला असेल, अथवा अर्जामध्ये एखादी माहिती स्पेलिंग वैगेरे चुकली असेल, डॉक्युमेंट बरोबर अपलोड केले नसतील तर तुम्हाला तुमचा अर्ज एडिट करायचा आहे, अन्यथा तुम्हाला अर्ज एडिट करण्याची काहीच गरज नाही.
लाडकी बहीण योजना फॉर्म एडिट करण्याची प्रक्रिया-
सुरूवातीला तुम्हाला नारी शक्ती दुत अॅप अपडेट करून घ्यायचे आहे.
अॅप अपडेट करून झाले की नंतर तुम्हाला ते ओपन करून लॉगिन करायचं आहे.
नारीशक्ती दूत अॅप च्या होम पेज वर आल्यावर केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
त्यानंतर लिस्ट मधून तुम्हाला तुमचा फॉर्म निवडून त्यावर क्लिक करायचे आहे. फॉर्म ओपन झाला की उजव्या कोपऱ्यात एडिट या बटणावर क्लिक करायचे आहे.
लाडकी बहिण योजनेचा फॉर्म पुन्हा ओपन होईल, जी माहिती चुकली आहे ती माहिती दुरुस्त करून घ्या.
एकदा फॉर्म एडिट केला की नंतर दुसऱ्यांदा अर्ज एडिट करता येत नाही, त्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म भरा.
शेवटी एकदा फॉर्म तपासा, खात्री झाल्यावर मगच सबमिट करा.
– जो मोबाईल नंबर दिला आहे, त्यावर ओटीपी येईल तो ओटिपी टाका अन् व्हेरिफिकेशन पूर्ण करा.