Thursday, March 20, 2025
Homeक्राईम न्यूजमुख्यमंत्री फडणवीस यांचा एकनाथ शिंदेंना धक्का; एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी सेठी, गृहविभागाचे राजपत्र

मुख्यमंत्री फडणवीस यांचा एकनाथ शिंदेंना धक्का; एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी सेठी, गृहविभागाचे राजपत्र

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई : एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी अप्पर मुख्य सचिव परिवहन संजीव सेठी यांची नियुक्ती केली. गृह विभागाकडून राजपत्र जारी करत मोठा बदल करण्यात आला. महायुतीत रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबतचा वाद सुरू आहे. त्यावरून धुसफूस सुरू असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह विभागाने राजपत्र प्रकाशित करत पुढील आदेशापर्यंत अप्पर मुख्य सचिव परिवहन संजीव सेठी यांच्याकडे महामंडळाचे अध्यक्षपद दिले. त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदेंसह परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना हा धक्का दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या एका निर्णयाने प्रताप सरनाईक यांना धक्का बसला आहे. कारण गृह विभागाकडून राजपत्र जारी करत मोठा बदल करण्यात आला. एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी अप्पर मुख्य सचिव परिवहन संजीव सेठी यांची नियुक्ती करण्यात आली. एकनाथ शिंदे सरकारच्या काळात नियमात बदल करून एसटीचे अध्यक्षपद भरत गोगावले यांना देण्यात आले होते. आता एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजीव सेठी यांची नेमणूक करून सेनेला धक्का दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments