Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांना मिळेना वेळ, नारळ फोडण्यास त्रिमूर्तीचा बसेना मेळ

मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांना मिळेना वेळ, नारळ फोडण्यास त्रिमूर्तीचा बसेना मेळ

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेवर दोन वर्षांपासून प्रशासक आहेत. मात्र, विविध विकासप्रकल्प तयार होऊनही श्रेयवादाच्या राजकारणात आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना वेळ मिळत नसल्याने रस्ते सफाई गाड्यांचे, एअर प्युरिफिकेशन फाउंटनचे उद्घाटन रखडले आहे. त्यामुळे रस्ते साफ होत नाहीत. दूषित हवेत शहरवासीयांना राहावे लागत आहे.

प्रशासकीय राजवट लागल्यानंतर पाच महिन्यांत महाविकास आघाडीच्या नेत्यांना, तर त्यानंतर महायुतीच्या नेत्यांना अर्थात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना वेळ मिळत नसल्याने प्रकल्प अद्याप सुरू झालेले नाहीत. पिंपरी-चिंचवड महापालिकेत गेल्या दोन वर्षांपासून प्रशासक आहेत. त्यामुळे सगळ्याच कामांवर प्रशासकीय वर्चस्व आहे.

नाट्यसंमेलनाच्या व राजकीय कार्यक्रमांच्या निमित्ताने दोन दिवस मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री व इतर पक्षांचेही ज्येष्ठ नेते शहरात तळ ठोकून होते. मात्र, शहरात प्रकल्पाच्या कामांना वेळ कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या कामांचे राहिले उदघाटन…

यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाई, एअर प्युरिफिकेशन फाउंटन, निगडी-किवळे उड्डाणपूल यासह विविध कामे पूर्ण झाली असून ती फक्त उद्घाटनाअभावी पडून आहेत. शहरातील प्रदूषण वाढले तरीही अधिकाऱ्यांना व राजकीय नेत्यांना यांचे गांभीर्य नाही का असा सवाल उपस्थित होत आहे.

आमदारांच्या हट्टामुळे शहर वेठीस

शहरातील आमदारांना पालकमंत्री अजित पवार यांच्याऐवजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन करण्याचे नियोजन आहे. त्यांची मर्जी राखण्यासाठी अधिकारीही वेळ घेण्यासाठी थांबले आहेत. मात्र, या तिघांचीही एकच वेळ मिळत नाही. त्यामुळे विकासकामांच्या उद्घाटनाला मुहूर्ताची तारीख मिळत नाही. आमदारांच्या हट्टापायी शहरवासीयांना वेठीस धरण्याचा प्रकार महापालिकेकडून होत असल्याचे चित्र आहे.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments