इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
कराड : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या दणदणीत विजयानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार? याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याबाबत दोन फॉर्म्युल्यांवर चर्चा असल्याची चर्चाही सुरु आहे. पण हे फॉर्म्युले नेमकं काय असू शकतात? यावर अजित पवार यांनी भाष्य केलंय. कराड इथं यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे भाष्य केलं.
मुख्यमंत्रीपदाचा काही फॉर्म्युला ठरला आहे का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, आम्ही तिघं जण एकत्र बसू आणि ठरवू की मुख्यमंत्री कोण होणार? काही फॉर्म्युला वैगरे काही नाही. काल राष्ट्रवादीच्या आमदारांनी माझी नेतेपदी निवड केली आणि सर्व अधिकार आम्हाला दिले. तसंच एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेतेपदी कोणाची निवड करायची हे त्यांचा पक्ष ठरवेल. त्यामुळं नंतर आम्ही तिघेही एकत्र बसू, आमच्या सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठांशी चर्चा करु.
खूप अपेक्षा लोकांकडून आमच्याबाबत वाढल्या आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात एखाद्या युतीनं एवढ्या मोठ्या प्रमाणावर भेटलेलं यश मोठं आहे. आपण अनेक लाट यापूर्वी पाहिल्या आहेत. पण महाराष्ट्रानं वेगळचं काहीतरी ठरवेललं होतं. यात लाभ देणाऱ्या योजना होत्या, त्यातून विकास कामासाठी विकास्या योजना सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याच प्रयत्न केला.
मुख्यमंत्रीपदासाठी यसे आहेत दोन फॉर्म्युला
महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदासाठी दोन फॉर्म्युल्यांची सध्या चर्चा सुरु आहे. यामध्ये २-२-१ असा फॉर्म्युला आणि अडीच-अडीच वर्षे असे दोन फॉर्म्युले आहेत. यामध्ये सुरुवातीला देवेंद्र फडणीवस २ वर्षे त्यानंतर एकनाथ शिंदे २ आणि अजित पवार १ वर्षे असा हा फॉर्म्युला असू शकतो.
तर, दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये पहिली आडीच वर्षे देवेंद्र पडणवीस आणि पुढची अडीच वर्षे एकनाथ शिंदे अशी ही मुख्यमंत्रीपदासाटी रस्सी खेच सुरु आहे.