इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
ठाणे | 8 नोव्हेंबर 2023 : मुंब्रा येथील शिवसेना शाखा बुलडोजरच्या सहाय्याने तोडण्यात आली. त्यानंतर ठाकरे गटाकडून आरोप प्रत्यारोप करण्यात आले. खासदार संजय राऊत यांनी या शाखेबाबत ट्विट केले. येत्या 11 तारखेला सायंकाळी चार वाजता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे या शाखेकडे येणार आणि जनतेला भेट देणार असल्याचं ट्विट त्यांनी केलं. मात्री त्यापूर्वीच शिंदे गटाने मोठी खेळी खेळली. एका दिवसात पाडलेल्या शाखेच्या ठिकाणी सपाटीकरण करत शिंदे गटाने कंटेनर रूम उभारत शाखा उभी केली. या शाखेवर शिवसेना शिंदे गटाचा बॅनर लावण्यात आला आहे. हे उद्धव यांना एक प्रकारे आव्हान देण्यात आले असे आम्हाला वाटत नाही. उद्धव ठाकरे येतील काही शंका आहे. कारण, संजय राऊत हा फेकू माणूस आहे. जरी ते आले तरी त्यांचे जे शिल्लक माणसे आहेत त्यांची भेट घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्या. ज्या त्यांनी इतक्या वर्षांत केल्या नाहीत असा टोला माजी नगरसेवक राजन किणे यांनी लगावला.