Tuesday, February 27, 2024
Home क्राईम न्यूज मुंबई-पुणे मार्गावर उद्या सहा तास वाहतूक बंद, पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग रेल्वे कॉरिडोरचे...

मुंबई-पुणे मार्गावर उद्या सहा तास वाहतूक बंद, पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग रेल्वे कॉरिडोरचे काम

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मोहोपाडा : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मुंबई मार्गिकेवर मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनतर्फे पनवेल- कर्जत दुहेरी मार्ग उपनगरी रेल्वे कॉरिडोरचे काम हाती घेतले आहे. चिखले ब्रिज येथे १८ जानेवारीला सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजता काम करण्यात येणार आहे.

कामावेळी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मुंबई मार्गिकेवरील सर्व प्रकारच्या वाहनांची (हलकी व जड अवजड) वाहतूक बंद करण्यात येणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून पुण्याकडून मुंबई बाजूकडे येणारी हलकी वाहने मुंबई मार्गिका किमी ५५.००० वरून वळवून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरून मार्गस्थ करता येतील.

पुण्याकडून मुंबईकडे येणारी सर्व प्रकारची वाहने पनवेल एक्झिटवरून वळवून महामार्ग क्रमांक ४८ वरून करंजाडेमार्गे कळंबोली तर महामार्ग क्रमांक ४८ वरून पुण्याकडून मुंबईकडे येणारी वाहने शेडुंग फाट्यावरून पनवेलच्या दिशेने मार्गस्थ होतील.

मुंबईकडे येणारी वाहने या मार्गे वळवली पुण्याकडून मुंबईकडे येणारी हलकी वाहने व बस मुंबई लेन किमी ३९.८०० खोपोली एक्झिटवरून वळवून महामार्ग क्रमांक ४८ वरून मार्गस्थ करता येतील. पुण्याकडून मुंबईकडे येणारी सर्व प्रकारची वाहने ही खालापूर टोलनाका शेवटच्या लेनने खालापूर एक्झिट किमी ३२.५०० येथून वळवून महामार्ग क्रमांक ४८ या मार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडंग टोलनाकामार्गे मुंबई वाहिनीवरून मार्गस्थ करता येतील.

RELATED ARTICLES

ईडी, सीबीआयचा वापर करून लोकशाहीवर घावः शरद पवार यांची महायुतीवर जोरदार टीका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या 'मोदी गॅरंटी' अशी जाहिरात करत आहेत. मात्र, त्यामधील एकही आश्वासन त्यांनी प्रत्यक्षात पूर्ण केलेले...

तिघांविरोधात मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलः बांधकाम सुरू असलेल्या गृहप्रकल्पाच्या सहाव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्देवी मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) बांधकाम सुरू असलेल्या एका गृहप्रकल्पात काम करणारा मजूर सहाव्या मजल्यावरून पडून दुर्देवीरीत्या मयत झाल्याची घटना मुंढवा भागात घडली. मजुराच्या...

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले: जे काम बंदुकीची गोळी करू शकत नाही ते काम अमली पदार्थ करतात; पुणे पोलिसांची कारवाई अभिमानास्पद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई केली असून ती अभिमानास्पद आहे. नजीकच्या काळातील देशातील ही सर्वात मोठी कारवाई...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

ईडी, सीबीआयचा वापर करून लोकशाहीवर घावः शरद पवार यांची महायुतीवर जोरदार टीका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या 'मोदी गॅरंटी' अशी जाहिरात करत आहेत. मात्र, त्यामधील एकही आश्वासन त्यांनी प्रत्यक्षात पूर्ण केलेले...

तिघांविरोधात मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलः बांधकाम सुरू असलेल्या गृहप्रकल्पाच्या सहाव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्देवी मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) बांधकाम सुरू असलेल्या एका गृहप्रकल्पात काम करणारा मजूर सहाव्या मजल्यावरून पडून दुर्देवीरीत्या मयत झाल्याची घटना मुंढवा भागात घडली. मजुराच्या...

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले: जे काम बंदुकीची गोळी करू शकत नाही ते काम अमली पदार्थ करतात; पुणे पोलिसांची कारवाई अभिमानास्पद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई केली असून ती अभिमानास्पद आहे. नजीकच्या काळातील देशातील ही सर्वात मोठी कारवाई...

फायनान्सची वसुली करणाऱ्यांकडून रिक्षा चालकाला मारहाणः भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) फायनान्सचे बाऊन्सिंग चार्जेस भरले नसल्याने फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्यांनी रिक्षा ताब्यात मागितली. त्यावेळी रिक्षा देण्यास नकार दिल्याने तिघांनी रिक्षा...

Recent Comments