Saturday, March 15, 2025
Homeक्राईम न्यूजमुंबई-पुणे प्रवास केवळ 25 मिनिटांत; हायपरलूप रेल्वे म्हणजे काय? जाणून घ्या..

मुंबई-पुणे प्रवास केवळ 25 मिनिटांत; हायपरलूप रेल्वे म्हणजे काय? जाणून घ्या..

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः पुणे-मुंबई नियमित प्रवास करणारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेच्या हायपरलूप प्रकल्पामुळे पुणे ते मुंबई हे अंतर फक्त 25 ते 30 मिनिटात गाठता येणार आहे. हा भारतीय रेल्वेचा हायपरलूप प्रकल्प आहे.

अधिक माहिती अशी की, हायपरलूप प्रकल्पासंदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. 2019 मध्ये हायपरलूप रेल्वेची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. व्हिडिओत त्यांनी म्हटले आहे, “प्रवासाची पद्धत बदलत चालली आहे. सगळीकडे नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. हायपरलूप योजनेच्या विकासासाठी आयआयटी मद्रासला दोन वेळा एक मिलियन डॉलरची मदत करण्यात आली आहे. यासाठी यापुढेही मदत करण्यात येणार आहे. हायपरलूप प्रकल्पाबाबत रेल्वे मंत्रालय आणि आयआयटी मद्रास या प्रकल्पावर काम करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हायपरलूप म्हणजे काय?

हायपरलूप हे एक नवीन विकसित होणारे तंत्रज्ञान आहे. हायपरलूप ही एक वेगाने धावणारी रेल्वे आहे. यामध्ये व्हॅक्यूम ट्यूबमध्ये मॅग्नेटिक लहरींचा वापर केला जातो. हायपरलूप ही रेल्वे 1100 किमी प्रति तास वेगाने धावू शकतो. ही जगातली सर्वांत वेगवान रेल्वे आहे. या रेलवेमुळे पर्यावरणासही फायदा होतो. कमी वीज लागते. यामुळे प्रदूषणही होत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments