इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पनवेल; मुंबई– पुणे द्रुतगती महामार्गावर (शुक्रवार) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने चाललेल्या महेंद्र पीकअप व्हॅनला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीमुळे महामार्गावरून मुबईकडे जाणारी वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती. या आगीमध्ये पीकअप व्हॅन जळून खाक झाली. व्हॅन मधील सामान देखील जळाले आहे. दरम्यान वाहन चालक सुखरूप बचावला आहे.
मुबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून पीकअप व्हॅन क्रमांक MH 12 TV 1503 शुक्रवारी उशिरा मध्यरात्री पुण्याहुन मुबईकडे निघाली होती. यावेळी गाडीमध्ये फ्रंटलाईन कुरियचा माल होता. ही गाडी मुबई-पुणे महामार्गावरील मुबईच्या दिशेने आल्या नंतर गाडीचा वाहन चालक कमलेश यादव यांनी गाडी बाजूला थांबवली. कारण गाडीच्या बोनेट मधून धूर येऊ लागला होता. धूर पहिल्या नंतर गाडीतून उतरून यादव यांनी बोनेट उघडले असता, शॉक सर्किट होऊन इंजीन जवळ आग लागली होती.
हे पहिल्यानंतर यादव याने गाडीतील पार्सल बॉक्स उतवरण्यास सुरवात केली, मात्र यादव एकटा असल्याने केवळ 21 बॉक्स तो उतरवू शकला, त्या नंतर काही सेकंदातच आगीने रौद्ररूप धारण करून, गाडीला विळखा घातला आणि गाडी अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडली. या दुर्घटनेत गाडीसह गाडीतील सामानाचे मोठे नुकसान झाले आहे.