इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वर मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. बसला टेम्पो ट्रकने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगतीवर खंडाळा बोरघाटात मध्यरात्री तीनच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातानंतर खाजगी बस 20 फूट खड्ड्यात कोसळली. कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोने मागून धडक दिली, त्यानंतर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस मार्ग सोडून खड्ड्यात कोसळली. सुदैवाने या भीषण अपघातामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्रस बसमधील 11 प्रवासी यात जखमी झाले आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच आयआरबी देवदूत पथक, खोपोली अपघातग्रस्तांना मदत करणारी टीम आणि महामार्ग पोलीस दाखल झाले. त्यांनी बसमधील अडकलेल्या बस चालकांसह प्रवाशांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आलं. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.