Saturday, May 24, 2025
Homeक्राईम न्यूजमुंबई-नाशिक महामार्गावर बसचा भीषण अपघात ; 10-12 जण जखमी तर आठ वर्षाच्या...

मुंबई-नाशिक महामार्गावर बसचा भीषण अपघात ; 10-12 जण जखमी तर आठ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई : मुंबई- नाशिक महामार्गावर भिवंडीजवळ बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 10 ते 12 जण जखमी झाले असून आठ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती समजताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केल आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावरील पडघा वडपे गावाजवळ अपघात घडला आहे. भिवंडीमधील कुटुंब खडवली येथे पिकनिक साठी गेले होते, तेव्हा हा अपघात घडला आहे. या अपघातात दहा ते बारा जण जखमी झाले आहेत. या जखमी झालेल्या पैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. बसचालक अतीवेगात असल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट उड्डाणपुलाखालील बोगद्याला धडकली. आणि मोठा अपघात झाला. अपघातावेळी बसमध्ये 20 प्रवास होते.

या अपघातामध्ये जखमी झालेल्या नागरिकांना उपचारासाठी तातडीने भिवंडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख हे देखील रुग्णालयात दाखल होऊन त्यांनी जखमींची विचारपूस केली आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments