Saturday, February 15, 2025
Homeक्राईम न्यूजमुंबईमध्ये वानखेडेवर अभिषेक शर्माचा शतकी तडाखा; भारताचा इंग्लंडसमोर 248 धावांचा डोंगर..

मुंबईमध्ये वानखेडेवर अभिषेक शर्माचा शतकी तडाखा; भारताचा इंग्लंडसमोर 248 धावांचा डोंगर..

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई : पाचव्या टी20 सामन्यात मुंबईमध्ये अभिषेक शर्मा नावाचंवादळ घोंघावंल आहे. एका बाजूने विकेट पडत असताना अभिषेक शर्माचा तडाखा सुरु होता. संजू सॅमसनची विकेट गेल्यानंतर अभिषेक शर्माने आली जादू दाखवत येईल त्या गोलंदाजाला त्याच्या शैलीत उत्तर देत होता. शर्माने मैदानात चौफेर चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली आणि दणदणीत शतक ठोकलं. त्यानंतरही त्याचा तडाखा सुरूच राहिला. भारताने 20 षटकात 9 गडी गमवून 247 धावांचा डोंगर उभा केला आहे आणि इंग्लंडला विजयासाठी 248 धावांचं आव्हान दिलं आहे. आता इंग्लंडचा संघ हे आव्हान कसं पेलणार? हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

भारताने या सामन्यात पॉवर प्लेमध्ये 95 धावा करत विक्रम केला आहे. तसेच भारताने 6.3 षटकात म्हणजेच 39 चेंडूत शतक पूर्ण केलं. तर अभिषेक शर्माने 37 चेंडूत आपलं शतक ठोकत वेगवान शतकांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. अभिषेक शर्मा 54 चेंडूत 13 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 135 धावा चोपल्या आहेत. भारताने 20 षटकात 9 गडी गमवून 247 धावा केल्या आणि विजयासाठी 248 धावांचं आव्हान दिलं आहे.

भारताने नाणेफेकीचा कौल गमवला हे एकी प्रकारे भारताच्या पथ्थ्यावरच पडलं. भारताच्या वाटेला फलंदाजी आली आणि भारताने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक पवित्रा स्वीकारून फटकेबाजी करायला सुरवात केली. संजू सॅमसनने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला आणि पहिल्या षटकात 16 धावा काढल्या. संजू सॅमसन 7 चेंडूत 16 धावा करून बाद झाला. त्यानंतर तिलक वर्माने 15 चेंडूत 24 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादव या सामन्यातही अपयशी ठरला. त्याला फक्त 2 धावाच करता आल्या. पण शिवम दुबेने 13 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकाराच्या माध्यमातून 30 धावा करून धावगती वाढवली. हार्दिक पटेल आणि रिंकु सिंह प्रत्येकी 9 धावा करून बाद झाले.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), जोस बटलर(कर्णधार), बेन डकेट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड

भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments