इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : चांगली नोकरी मिळावी यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रयत्नच करावे लागतात. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर मुंबईतील ICAR येथे नोकरी मिळू शकते. त्यानुसार, रिक्त पदावर भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.
‘सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी’ (ICAR) मुंबई येथे यंग प्रोफेशनल । या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2025 असणार आहे. या प्रक्रियेंतर्गत केवळ एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार असून, सदर मुलाखत ही 20 फेब्रुवारी 2025 रोजी घेतली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 30000 रुपयांपर्यंत पगारही मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.cicr.org.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.