इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून गारवा ओसरल्याचे आहे उष्णता वाढल्याचे पाहायला मिळत आहे. ईशान्य मान्सून माघारी परतत असल्याने राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण दिसून येत आहे. आज १ फेब्रुवारी २०२५ रोजी राज्यातील जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळेल अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. तर अनेक ठिकाणी सकाळी धुके पाडण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज मुंबई शहर आणि उपनगरामध्ये ढगाळ आकाश असेल. हवामान विभागानुसार मुंबईतील कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १९ अंश सेल्सिअस एवढे असेल. मुंबईच्या किमान आणि कमाल तापमानात वाढ होताना पाहायला मिळत आहे.
तर हवामान विभागानुसार पुणे शहरामध्ये सकाळच्या वेळी धुके आणि त्यानंतर ढगाळ आकाश पाहायला मिळेल. आज पुण्यातील कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १५ अंश सेल्सिअस असेल.
दुसरीकडे हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळच्या वेळी दाट धुके पडण्याची शक्यता आहे. संभाजीनगरमधील कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तर किमान तापमान १४ अंश सेल्सिअस असेल. सकाळी थोडा गर्व तर दुपारी उष्णता असेल. उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये दुपारनंतर ढगाळ आकाश पुन्हा सुरुवात होईल. तर नाशिकमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस एवढे राहील.
विदर्भातील महत्वाचे शहर असलेल्या आणि राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये आज ढगाळ आकाश राहील. नागपूरमधील कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १९ अंश सेल्सिअस एवढे असेल. हवामान विभागानुसार पुढच्या दोन दिवसांसाठी सकाळी थोडा गारवा तर दुपारी उष्णता आणि आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.