Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजमुंबईच्या दादरमध्ये मतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार; कॅब चालकाला अटक

मुंबईच्या दादरमध्ये मतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार; कॅब चालकाला अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबईच्या दादर परिसरात धक्कादायक घटना घडली. मुंबई दाखवण्याच्या बहाण्याने मतीमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी कॅब चालकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद जलील खलील (वय, ३३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी १५ वर्षांची असून ती मानसिक आजारी आहे. पीडिताचे कुटुंबीय तिला नातेवाईकांच्या घरी सोडून मूळ गावी गेले. दरम्यान, गुरुवारी रात्री एक वाजताच्या सुमारास पीडिता कोणालाही न सांगता एकटीच घरातून बाहेर पडली आणि तेवढ्यात कॅब चालकाची नजर तिच्यावर पडली. कॅब चालकाने तिला मुंबई फिरवण्याचे आमिष दाखवून कारमध्ये बसवले. त्यानंतर काही वेळ फिरल्यानंतर त्याने कार दादर येथील निर्जनस्थळी नेऊन पार्क केली आणि पीडितावर बलात्कार केला.

या घटनेनंतर आरोपीने पीडिता पुन्हा तिथेच नेऊन सोडून दिले, जिथे ती त्याला दिसली होती. आरोपीने त्याचा मोबाईल क्रमांक एका कागदावर लिहून पीडिताला दिला. तसेच पुन्हा भेटायचे असल्यास त्याला कॉल करण्यास सांगितले. घरी गेल्यानंतर पीडिताने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर नातेवाईकांनी दादर पोलीस ठाण्यात आरोपी कॅब चालकाविरोधात तक्रार दाखल केली.

यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि पीडिताजवळ असलेल्या मोबाईल क्रमांच्या आधारे आरोपीचा शोध घेतला आणि त्याला वडाळा येथून अटक केली. आरोपीविरोधात आयपीसी कलम ३७६ अंतर्गत आणि लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम, २०१२ पॉक्सोच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments