Thursday, March 20, 2025
Homeक्राईम न्यूजमुंढवा भागात 17 लाख 80 हजारांचा गांजा जप्त; अमली पदार्थ विरोधी...

मुंढवा भागात 17 लाख 80 हजारांचा गांजा जप्त; अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यातील मुंढवा भागातुन महत्वाची बातमी समोर आली आहे. मुंढवा भागात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 16 लाख 80 हजारांचा 28 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. प्रमोद सुधाकर कांबळे (वय 44, रा. किल्ला वेस, करमाळा, जि. सोलापूर), विशाल दत्ता पारखे (वय 41, रा. मोहननगर, आदित्य सोसायटी, विश्रांतवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

28 किलो गांजा जप्त

मिळालेल्या माहितीनुसार, मुंढवा परिसरात अमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत होते. त्यावेळी प्रमोद आणि विशाल हे दोघे गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी आझाद पाटील यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापाळा लावून प्रमोद कांबळे आणि विशाल पारखे यांना पकडण्यात आले. त्यांना पकडल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या पिशवीची तपासणी केली असता त्याच्यात 28 किलो गांज्या आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत तब्बल 16 लाख 80 हजारांचा 28 किलो गांजा जप्त केला आहे. आरोपी कोणाला गांजा विकणार होते, याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.

अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, आझाद पाटील, मयूर सूर्यवंशी, संदीप जाधव, संदीप शेळके, योगेश मांढरे, युवराज कांबळे, चेतन गायकवाड, रवींद्र रोकडे, दिनेश बास्टेवाड, दिशा खेवलकर यांनी ही कारवाई केली.

गांजा, मेफड्रोन विक्री, तसेच तस्करी करणाऱ्यांविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments