Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज मी पाणी प्यायला लागलो आणि...., 'त्या' प्रश्नावर मनोज जरांगे यांचं थेट उत्तर

मी पाणी प्यायला लागलो आणि…., ‘त्या’ प्रश्नावर मनोज जरांगे यांचं थेट उत्तर

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

जालना : राज्याच्या काही भागात मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. दोन आमदारांची घर पेटवण्यात आली. बसेस जाळण्यात आल्या. राजकीय नेत्यांची कार्यालय फोडण्यात आली. यावर आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना विचारण्यात आलं. ‘मी पाणी प्यायला लागल्यानंतर मराठा समाज शांत झाला’ असं उत्तर त्यांनी दिलं. “मराठा समाजाने सांगितलं, आरक्षणाला दोन दिवस उशिर झाला तरी चालेल, पण आम्हाला तुमची गरज आहे. त्यांच्या सांगण्यानुसार मी पाणी प्यायला सुरुवात केली. जाहीरपणे पाणी पितोय असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “मी पाणी पिल्यानंतर मराठा समाज शांत होणार आणि माझ्या मतानुसार मराठा समाज शांत झालाय. पुन्हा उद्रेक करु नका, शांत व्हा” असं मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केलं.

“क्षत्रिय मराठ्याने लढायच असतं, आत्महत्या करुन मरायच नसतं. मी सुद्धा लढतोय. मी मरणाला भीत नाही. पाण्यात ताकत आहे. पाणी प्यायला लागल्यापासून मी उठून बसलोय” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “मराठा समाज दिलेल्या शब्दाला जागला. सगळीकडे शांततेत आंदोलन सुरु आहे. पहिलं साखळी उपोषण नंतर आमरण उपोषण. आमरण उपोषण जमेल तसं करा पण साखळी उपोषण सोडू नका. आपण राजकीय नेत्यांच्या दारात जायच नाही आणि त्यांना गावात येऊ द्यायचं नाही यावर ठाम आहोत” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मुख्यमंत्र्यांशी मनोज जरांगेंची काय चर्चा झाली?

मनोज जरांगे पाटील यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. त्यावर ते म्हणाले की, “मी पाणी प्यायला लागलो आणि मराठे थंड झाले. तुम्ही अर्धवट आरक्षण देऊ नका असं मी सांगितलं. मराठवाड्यातले भाऊ तुमचे, महाराष्ट्रातले तुमचे नाहीत का? मराठवाड्यातले माझे, पश्चिम महाराष्ट्रातले माझे नाहीत का? अर्धवट नको, सरसकट आरक्षण द्या. विदर्भातून निजामकालीन पुरावे घ्या, महाराष्ट्राला आरक्षण द्या यावर मी ठाम आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

RELATED ARTICLES

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) राजगुरुनगरः चाकण येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी १२...

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा; पुणे महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे शहरातील सर्व आस्थापनांच्या पाट्या देवनागरी लिपीत...

ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींचा बँक बॅलेन्स प्रॉपर्टी बाबतचा तपास करणार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट चालविणारा अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या भूषण पाटील,...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) राजगुरुनगरः चाकण येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी १२...

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा; पुणे महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे शहरातील सर्व आस्थापनांच्या पाट्या देवनागरी लिपीत...

ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींचा बँक बॅलेन्स प्रॉपर्टी बाबतचा तपास करणार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट चालविणारा अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या भूषण पाटील,...

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

Recent Comments