इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
किल्लारी | 30 सप्टेंबर 2023, : किल्लारी भूकंप दुर्घटनेला आज 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर भूकंपग्रस्तांकडून शरद पवारांचा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावात पार पडणार शरद पवारांचा सन्मान केला जाणार आहे किल्लारीत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी भव्य असा मंडप उभारण्यात आला आहे. किल्लारी गावातील क्रांतिकारी मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही स्थानिकांसी संवाद साधला. तेव्हा या भूकंपग्रस्त नागरिकांनी आपल्या दुःखद आठवणी सांगितल्या. यावेळी या कटू आठवणी सांगताना अनेकांना आपले अश्रू अनावर झाले.
फुलचंद शिंदे आणि धनंजय माळी या भूकंपग्रस्त नागरिकांशी आम्ही संवाद साधला. तेव्हा किल्लारी त्यांनी 30 वर्षांपूर्वी किल्लारीत झालेल्या भूकंपाच्या आठवणी सांगितल्या. 30 सप्टेंबर 1993 रोजी पहाटेच्या सुमारास अचानक मोठा गोंधळ सुरु झाला. मी घराच्या छतावर झोपलो होतो. अचानक खाली कोसळलो. सुरूवातीला आमच्या गावाजवळचा तलाव फुटला, अशी अफवा पसरली. गावातील लोक अचानकपणे गावाबाहेर पळत सुटली. मात्र प्रत्यक्षात भूकंप झाल्याचं आम्हाला उशिरा कळालं, असं ते म्हणाले.
या भूकंपात माझा मुलगा आणि सून मृत पावली. तेव्हापासून आजपर्यंत आम्हाला रोज त्यांची आठवण येते. आम्ही घराबाहेर आलो. तेव्हा गावात दोन तास फक्त धुरळाच होता. आजही त्या आठवणी जागल्या की डोळ्यात पाणी येतं. गावात नुसता मृतदेहांचा खच पडलेला पाहायला मिळत होता, असं स्थानिकांनी सांगितलं.