Wednesday, November 29, 2023
Home क्राईम न्यूज मिसाईल-बॉम्बहल्ल्यापासून सुरक्षित आहे हे ठिकाण, या बंकरमध्ये होते इस्रायलच्या पंतप्रधानांची मिटींग

मिसाईल-बॉम्बहल्ल्यापासून सुरक्षित आहे हे ठिकाण, या बंकरमध्ये होते इस्रायलच्या पंतप्रधानांची मिटींग

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नवी दिल्ली | 21 ऑक्टोबर 2023 : हमास आणि इस्रायलचे युद्ध सुरु असताना जेरुसलेम येथील नॅशनल मॅनेजमेंट सेंटर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नॅशनल मॅनेजमेंट सेंटर हे एक प्रकारचे मजबूत बंकर आहे. या बंकरवर कोणत्याही मिसाईल हल्ल्याचा कोणताही प्रभाव पडत नाही. नुकतीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी इस्रायलला भेट दिली त्यावेळी त्यांची आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांची भेट या बंकर सदृश्य नॅशनल मॅनेजमेंट सेंटरमध्ये होईल असे म्हटले जात होते. पंतप्रधान नेतान्याहू यांनी त्यांच्या गेल्या दोन-तीन महिन्यातील तीन बैठका येथे घेतल्या होत्या. परंतू राष्ट्राध्यक्ष बायडन तेल अवीव येथूनच माघारी परतले.

इस्रायलचे नॅशनल मॅनेजमेंट सेंटर (बंकर) एखाद्या सायन्स फिक्शन मुव्ही सारखे दिसते. हे बंकर इस्रायलच्या अत्यंत महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा करण्यासाठी ते सक्षम आहे. इस्रायलचे हे बंकर वेगळे आहे. कारण अन्य देशांच्या तुलनेच याची माहिती गोपनीय नाही. याचा अर्थ हे बंकर लो प्रोफाईल किंवा अन्य देशांपेक्षा हलक्या दर्जाचे आहे असे अजिबात नाही. जेरुसलेमच्या नॅशनल क्वार्टर क्षेत्रात इस्रायली संसद ( नेसेट), परराष्ट्र मंत्री निवास, पंतप्रधानाचे निवास आणि सुप्रीम कोर्ट इमारतीच्या जवळ या बंकरच्या निर्मितीला 2006 च्या लेबनॉन युद्धानंतर झाली होती. लेबनॉनने उत्तर इस्रायलमध्ये लागोपाट केलेल्या रॉकेट हल्ल्यामुळे हे बंकर निर्माण करण्यात आली.

इस्रायलचे हे युनिक डबल-फेंस्ड फॅसिलीटी असलेले बंकर अमेरिकेच्या डुम्सडे बंकर सारख्या आधुनिक कला संग्रहालयासारखे दिसते. डुम्सडे बंकर प्रलयापासून वाचण्यासाठी तयार केले होते. या बंकरमध्ये विंडो नसलेले एक ग्राऊंड लेव्हल कॉम्प्लेक्स आहे. ज्यात अनेक प्रवेशद्वार आहेत एक गोलाकार टर्नअराऊंड आहे. हे बंकर जमिनीच्या खूप आत आहे. अणुहल्ला आणि जैविक तसेच रासायनिक हल्ल्यापासून एकाच वेळी शेकडो लोकांना वाचविण्यासाठी हे बंकर सक्षम आहे.

कोरोनाकाळात बंकरचा वापर

2018 साली इस्रायली न्यूज वेबसाईट Yedioth Ahronoth वर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानूसार इस्रायलच्या या बंकरला अमेरिकेतील अंडरग्राऊंड शहरांच्या धर्तीवर तयार केले आहे. या बंकरमध्ये बेडरुम, वर्क स्पेस आणि कॅफेटेरियाची व्यवस्था आहे. या बंकरला अनेक “अनेक अब्ज इस्रायली चलन शेकेल पासून तयार केले आहे. या बंकरला भेट दिलेल्या व्यक्तीच्या मते या बंकरचा 95 टक्के भाग अंडरग्राऊंड आहे. आत जाण्यासाठी लिफ्टचा रस्ता आहे. बंकरमध्ये जाणाऱ्या व्यक्तीला ही लिफ्ट एखाद्या साय-फाय मुव्हीचा अनुभव देते. बाहेर जगापासून येथील जग वेगळे आहे. 2020 मध्ये इस्रायलने कोरोना काळात या बंकरचा क्वारंटाईनसाठी उपयोग केला होता..

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments