Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजमिठाच्या पोत्यात 1-1 किलोचे पॅकेट भरून तस्करीः पुण्यात 1400 कोटींचे 700...

मिठाच्या पोत्यात 1-1 किलोचे पॅकेट भरून तस्करीः पुण्यात 1400 कोटींचे 700 कि. एमडी ड्रग्ज जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

दिल्लीत 800 कोटींच्या 400 किलोसह पुणे पोलिसांनी केले 2200 कोटींचे ड्रग्ज हस्तगत

नाशिकचा ड्रग तस्कर ललित पाटील याने पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात ड्रग उत्पादकांकडून ड्रग बनवण्याचा फॉर्म्युला घेत भावाच्या मदतीने नाशिक परिसरात थेट ड्रग उत्पादन कारखाना टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

त्यानंतर आता पुन्हा पुण्यातील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी वैभव माने आणि हैदर शेख हे येरवडा कारागृहात असताना एका आफ्रिकन कैद्याच्या संर्पकात येऊन कारागृहातून जामिनावर बाहेर आल्यावर ड्रग तस्करीचा व्यवसाय सुरू केल्याचे पोलिस कारवाईत उघडकीस आले आहे.

यासाठी मीठ व्यवसायाच्या माध्यमातून ड्रग तस्करी करण्यासाठी हैदर शेख याला एक लाख रुपये प्रत्येक डीलमागे, तर विविध शहरात हे ड्रग पोहचवण्यासाठी वैभव माने यास ३५ हजार रुपये मिळत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

काय आहे मेफेड्रोन अन् मेथ संभाजीनगरपाठोपाठ पुण्यात सापडलेला मेफेड्रोन हा पदार्थ उत्तेजक द्रव्यासारखा अथवा नशेसाठी वापरला जातो. तर मेथ हा ड्रग लैंगिक उत्तेजना वाढवण्यासाठी वापरला जातो. अमली पदार्थ तयार करण्यासाठी यात डोबिंवलीच्या युवराज बबन भुजबळ या केमिकल ड्रग्ज तज्ज्ञ आणि पुण्यातील अर्थ केम लॅबोरेटरी कंपनी त्यांना साह्य करीत होती.

आफ्रिकन कैद्याच्या संपर्कामध्ये येऊन सुरू केली ड्रगची तस्करी

मिठाच्या पोत्यात १-१ किलोग्रॅम वजनाचे एमडी अणि मेथ नावाचे अमली पदार्थ भरून देशविदेशात तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दौंड तालुक्यातील (जि. पुणे) कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील अर्थ केम लॅबोरेटरीवर छापा मारून पोलिसांनी १४०० कोटी रुपयांचे ७०० किलो मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थाचा साठा जप्त केला. तर याच गुन्ह्यातील अारोपींनी दिलेल्या टिपवरून दिल्लीतही एका गोदामावर छापा मारून ८०० कोटी रुपयांचे ४०० किलो मेथ आणि एमडी ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे येरवडा कारागृहातून हे ड्रग्ज रॅकेट चालत होते.

येरवडा कारागृहाचे कनेक्शन, महाराष्ट्रात अातापर्यंतचे सर्वात मोठे ड्रग्ज तस्करी रॅकेट, संभाजीनगरात सापडले होते ५०० कोटींचे १५० कि. एमडी दौंडमधील कुरकुंभ एमअायडीसीत अर्थ केम कंपनीवर छापा, कंपनी मालक, डोंबिवलीतील केमिकल तज्ज्ञासह पाच जणांना केली अटक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments