Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजमावळ लोकसभा निवडणूकः मर्सिडीजमध्ये मिळाली 30 लाखांची रोकड, पिंपरी चिंचवडच्या निगडी हद्दीत...

मावळ लोकसभा निवडणूकः मर्सिडीजमध्ये मिळाली 30 लाखांची रोकड, पिंपरी चिंचवडच्या निगडी हद्दीत सुरू होती चेकिंग

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठया प्रमाणात अवैध कारवाईवर पोलिस व निवडणूक भरारी पथकांची नजर आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात गस्त घालत असताना स्टॅटीक सर्व्हेलन्स टीमला मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड परिसरात एका मर्सिडीज सारख्या महागड्या कारमध्ये तब्बल 29 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम मिळून आलेली आहे. सदर रक्कम नेमकी कोठून आणली व कोणाला दिली जाणार होती याबाबत खुलासा अद्याप होऊ शकलेला नाही.

निवडणुक आयोगाचे निर्देशानुसार विविध मतदारसंघात प्रचारात होणारा खर्चावर देखरेख ठेवण, गैरप्रकार नियंत्रीत करणे, अवैध शस्त्रे, दारु, पैसे याची वाहतूक रोखणे यासाठी स्टॅटिक सर्व्हलन्स (एसएसटी) पथक निर्माण केले आहे. यात एक अधिकारी व चार पोलिस कर्मचारी असतात व वेगवेगळ्या चेकपोस्टवर ते थांबून वाहनांची तपासणी करतात. अशाचप्रकारे मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी चिंचवड शहराचे हद्दीत निगडी येथे एसएसटी पथक थांबलेले असताना, त्यांना एक काळया रंगाची संशयित मर्सिडीज कार दिसून आली. संबंधित कारचालकास ही कार थांबविण्याचा इशारा केल्यावर कारची व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये झडती घेण्यात आली. त्यावेळी कारचे पाठीमागील डिक्कीत एका बॅगेत 29 लाख 50 हजार रुपयांची रोकड मिळून आली आहे. ही रक्कम आयकर विभाग यांचेकडे पुढील चौकशीसाठी देण्यात आली आहे. यापूर्वी देखील पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुणे-मुंबई रस्त्यावर ऊर्स टोलनाका येथे वाहनाची तपासणी करताना, एका एसयूव्ही कारमधून तब्बल 50 लाख रुपयांची रक्कम जप्त केली होती.

मद्यपी हॉटेलवर कारवाई

पुण्यातील कोथरुड येथे हॉटेल खिंड ढाब्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून मद्यपींवर कारवाई केली आहे. याप्रकरणी ढाबा चालकासह चारजणांना अटक करुन त्यांचे एकाच दिवसात दोषारोपत्र न्यायालयात दाखल करण्यात आला. न्यायालयाने ढाबा चालकास एक लाखांचा दंड व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिन्याची साधी कैद्यची शिक्षा सुनावली आहे. ढाबा चालक योगेश सुरेथ माथवड असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक प्रताप बोडेकर यांचे पथकाने ही कारवाई केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments