इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील कान्हे येथे अनैतिक संबंधाच्यासंशयावरून युवकाची धारदार शस्त्राने हत्या केली. मंगळवारी सायंकाळी (दि. १) सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वडगाव मावळ पोलिसांनी एका विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेतले असून दोन आरोपींना अटक केली आहे.
वैभव उमेश सातकर (वय २३ रा. आंबेवाड़ी, कान्हे ता. मावळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी अंकुश जयवंत सातकर (रा.आंबेवाडी कान्हे), सोपान रामचंद्र खंगले (वय ६५ रा. निगडे ता. मावळ) या आरोपींना अटक करण्यात आली आहे. यासोबतच एका विधी संघर्ष मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अंकुश याच्या पत्नीशी मयत वैभवचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून आरोपींनी हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. पुढील तपास वडगाव मावळ स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम करीत आहेत.