Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज मालकासमोरच घसरून पडला दुचाकीचोरटा; पोलिसांत नेला !

मालकासमोरच घसरून पडला दुचाकीचोरटा; पोलिसांत नेला !

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी : दुचाकीची चोरी करून ती फिरवत असताना संशयित घसरून पडला आणि थेट दुचाकी मालकालाच सापडला. या संशयिताला दुचाकी मालकाने पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना गुरुवारी (दि. १४) दत्तनगर टेकडी, दिघी येथे घडली. या प्रकरणी आप्पासाहेब माधव महाडिक (वय ३१, रा. दिघी) यांनी या प्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित कृष्णा दत्तात्रय म्हेत्रे (रा. भोसरी) याला अटक केली आहे.

पोलिस हवालदार सतीश जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आप्पासाहेब यांनी दुचाकी दत्तनगर टेकडी येथे पार्क केली होती. मात्र, त्यांनी नंतर येऊन पाहिले असता ती त्यांना दिसून आली नाही. त्यामुळे ते या विषयी फिर्याद देण्यासाठी दिघी पोलिस ठाण्यात गेले.

फिर्याद देऊन परत जात असताना रस्त्यावर एक दुचाकीचालक पडल्याचे त्यांना दिसले. त्यांनी जवळ जावून पाहिले असता पडलेली दुचाकी चोरीला गेलेली त्यांचीच असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ दुचाकीवरून पडलेल्या संशयित कृष्णा याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस संशयित कृष्णा याच्याकडे चौकशी करत आहेत. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे.

RELATED ARTICLES

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) राजगुरुनगरः चाकण येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी १२...

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा; पुणे महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे शहरातील सर्व आस्थापनांच्या पाट्या देवनागरी लिपीत...

ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींचा बँक बॅलेन्स प्रॉपर्टी बाबतचा तपास करणार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट चालविणारा अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या भूषण पाटील,...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) राजगुरुनगरः चाकण येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी १२...

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा; पुणे महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे शहरातील सर्व आस्थापनांच्या पाट्या देवनागरी लिपीत...

ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींचा बँक बॅलेन्स प्रॉपर्टी बाबतचा तपास करणार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट चालविणारा अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या भूषण पाटील,...

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

Recent Comments