Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज मानाच्या पाचही गणरायांचे दिमाखात विसर्जन; मानाच्या गणरायांची मिरवणूक ९ तास चालली

मानाच्या पाचही गणरायांचे दिमाखात विसर्जन; मानाच्या गणरायांची मिरवणूक ९ तास चालली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : ढोल-ताशांच्या गजरात, सनई- चौघड्याच्या निनादात आणि वरुणराजाच्या साक्षीने पुण्यातील पाचही मानाच्या गणरायांचे हौदात विसर्जन करण्यात आले. सकाळी १० वाजता मिरवणूक सुरू झाली होती आणि पाचही मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीला ९ तास लागले. विसर्जन मिरवणुकीत वरूणराजाने सायंकाळी ४ वाजता हजेरी लावली, तरी देखील गणेश भक्तांची गर्दी कमी झाली नाही.

यंदा गणरायाची विसर्जन मिरवणूक अतिशय उत्साहात, आनंदात निघाली आहे. ढोलताशांचा गजर, बाप्पा मोरयाचा जयघोष, सुरेल नगारावादन, बँड पथकांचे उत्कृष्ट वादन, देखाव्यातून इतिहासाची जागृती करण्यात आली. पुण्यातील वैभवशाली विसर्जन मिरवणुकीची देदीप्यमान परंपरा पुणेकरांना अनुभवायला मिळत आहे. आता पाच मानाच्या गणरायांचे विसर्जन झाले असून, प्रमुख मंडळांची मिरवणूक पहायला मिळत आहे…

सकाळी दहा वाजता महात्मा फुले मंडई येथून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पहिल्या मानाच्या कसबा गणपतीची आरती केली. गणरायाची आरती करून मानाच्या आणि मुख्य गणपतींची विसर्जन मिरवणूक मार्गस्थ झाली. चांदीच्या पालखीतून, फुलांनी सजविलेल्या आकर्षक रथातून लाडक्या बाप्पाच्या मिरवणुकीत पारंपरिक ढोल-ताशा पथकांचे वादन, बँडची सुरावट ऐकायला मिळाली. तसेच, रांगोळीच्या पायघड्याही मिरवणूक मार्गांवर घालण्यात आल्या होत्या.

मानाचा पहिला : कसबा गणपती गणरायाची विसर्जन मिरवणूक चांदीच्या पालखीतून निघाली. सकाळी उत्सव मंडपातून विसर्जन मिरवणूक महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याकडे आली. आरती झाल्यावर मिरवणुकीमध्ये नगारखाना, प्रभात बँड, कामायनी प्रशाला, बँक ऑफ इंडियाचे पथके सहभागी झाली होती. रमणबाग प्रशाला, रुद्रगर्जना ढोल-ताशा पथक आणि कलावंत ढोल-ताशा पथकांचा निनाद मिरवणुकीत ऐकायला मिळाला. मंडळाचे कार्यकर्ते खांद्यावरून पालखी घेऊन पुढे सरकत होते. अतिशय वैभवशाली अशी ही मिरवणूक पहायला मिळाली.

मानाचा दुसरा : श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट

सकाळी नऊ वाजता उत्सव मंडपासून श्री गणरायाची मूर्ती पालखीत विराजमान झाली. सकाळी साडेदहा वाजता महात्मा फुले मंडई येथून मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मिरवणुकीमध्ये पारंपरिक पोशाखात अश्वारूढ कार्यकर्ते है आकर्षणाचा केंद्रबिंदू होते. यंदा सतीश आढाव यांचे नगारावादन, समर्थ प्रतिष्ठान, ताल ढोल-ताशा पथकांचे वादन होते. पारंपरिक वेशभूषेत महिला आणि पुरुष कार्यकर्ते सहभागी झाल्याने मिरवणूकीचे वैभव आणखी वाढले. विष्णुनादचे कार्यकर्ते पालखीपुढे शंखनाद करत होते. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी भाविकांची गर्दी झाली. या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शिवमुद्रा ढोल-ताशा पथकाने खास शिवराज्याभिषेक रथ तयार केला होता. यंदा प्रथमच न्यू गंधर्व ब्रास बँडचे वादक हनुमान चालिसा आणि मंगल अमंगल हरी ही रामायण चौपाई वाजविण्यात आली.

मानाचा तिसरा : श्री गुरुजी तालीम मंडळ

अतिशय नयनरम्य अशा जय श्रीराम ‘रामराज्य’ या फुलांच्या आकर्षक रथात श्रीगणेशाची मूर्ती विराजमान झाली होती. प्रत्येकाचे लक्ष हा रथ वेधून घेत होता. स्वप्निल व सुभाष सरपाले आणि अविनाश जिंदम यांनी हा रथ तयार केला होता. नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळा (फुलगाव) यांचे प्रात्यक्षिके व ढोल- ताशा पथकांचे वादनाने भाविक दंग होऊन गेले. नादब्रह्म ढोल- ताशा पथक आणि नादब्रह्म ट्रस्ट ढोल-ताशा पथकाच्या निनादाने अवघा आसमंत दुमदुमून गेला.

मानाचा चौथा : श्री तुळशीबाग गणपती मंडळ ट्रस्ट

यंदा गणपतीची मिरवणूक महाकाल रथातून निघाली. रथाचे वैभव काही औरच होते. हा रथ 28 फूट उंच असून, फुलांनी सजविलेली 12 फूट उंचीची श्री महाकालची पिंड प्रमुख आकर्षण होते. रथामध्ये हायड्रोलिक तंत्रज्ञानाचा वापर झाला. लकडी पुलावर त्याचा वापर करण्यात आला. पुष्पसजावटकार सरपाले बंधूंनी रथाची सजावट केली होती. उज्जैन येथील श्री महाकालेश्वराची सवारी ज्याप्रमाणे निघते, त्याप्रमाणे मिरवणूक काढण्यात आली. त्यासाठी उज्जैनवरून खास अघोरी महाराज यांना बोलावले होते. तसेच, बाहुबली महादेव हे या मिरवणुकीचे खास आकर्षण होते. मिरवणुकीत अग्रस्थानी लोणकर बंधूंचा नगारावादनाचा गाडा, स्व- रूपवर्धिनी, गजलक्ष्मी, शिवप्रताप वाद्य पथक सहभागी झाली होती.

मानाचा पाचवा : केसरीवाडा गणपती

केसरीवाडा गणपती दुपारी दीड वाजता महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यासमोर आला. तिथे रोहित टिळक यांनी लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात झाली. विविध फुलांनी सजविलेल्या पारंपरिक पालखीत श्रीगणेश मूर्ती विराजमान होते. मिरवणुकीत गणेशोत्सवाचे प्रमुख डॉ. रोहित टिळक हे सहभागी झाले होते. बिडवे बंधूंच्या नगारावादनासह मिरवणुकीत शिवमुद्रा, श्रीराम आणि राजमुद्रा ढोल-ताशा पथकांचे वादन पुणेकरांना ऐकायला मिळाले. इतिहासप्रेमी मंडळाकडून चापेकर बंधूंना प्रेरणा देणारे लोकमान्य टिळक हा देखावाही मिरवणुकीत सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. हा जीवंत देखावा सादर करण्यात आला होता. रँडचा वध करण्यात चापेकर बंधूंना लोकमान्य टिळक यांनी प्रेरणा दिली होती. त्यांचा हा देखावा सादर केला होता.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments