Friday, July 4, 2025
Homeक्राईम न्यूजमाणिकबाग परिसरात वाहन व दुकान तोडफोड प्रकरणी तिघांना अटक; गुन्हे शाखेच्या युनिट...

माणिकबाग परिसरात वाहन व दुकान तोडफोड प्रकरणी तिघांना अटक; गुन्हे शाखेच्या युनिट 3 ची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः सिंहगड रस्ता परिसरातील माणिकबाग येथे चारचाकी वाहनांची तसेच एका दुकानाची तोडफोड केल्याची घटना घडली होती. तिघांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याप्रकरणी पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-३ च्या पथकाने तिघांना अटक केली आहे.

प्रथमेश मंजुनाथ सौसुध्दी (२४, रा. वडगाव बुद्रुक), सुजय सतीश चव्हाण (१९, रा. कोथरूड) आणि श्रेयस नंदकुमार भागवत (१८, रा. वडगाव बुद्रुक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींना पकडले

२८ जून रोजी माणिकबाग भागात १५ ते २० चारचाकी वाहनांची तसेच मोहिते पॅराडाईज इमारतीतील एका दुकानाची तोडफोड झाल्याची घटना घडली होती. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधित आरोपींची ओळख पटवून त्यांना त्यांच्या घरातून अटक करण्यात आली आहे.

सदर कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ आणि सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, उपनिरीक्षक गणेश फरताडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार पंढरीनाथ शिंदे, मुंकुद तारू, किशोर शिंदे, कैलास लिम्हण, हनिफ शेख, अमोल काटकर, अतुल साठे, योगेश झेंडे, पुरुषोत्तम गुन्ला, तुषार किंद्रे, अक्षय गायकवाड आणि अर्चना वाघमारे यांनी संयुक्तपणे केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments