Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज माझ्या मित्राची हत्या केली; तेलंगणातील भाजपा आमदाराने सांगितली शरद मोहळची आठवण

माझ्या मित्राची हत्या केली; तेलंगणातील भाजपा आमदाराने सांगितली शरद मोहळची आठवण

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई/सोलापूर – पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. याप्रकरणी गोळ्या झाडणाऱ्या साहिल पोळेकरसह त्याला मदत करणाऱ्या ८ जणांना अटक करण्यात आली. दहा वर्षांपूर्वी झालेल्या मामाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी साहिलने मामासह कट रचून मोहोळचा गेम केल्याचे उघड झाले असून, या कटात दोन वकिलांचाही हात असल्याचे पुढे आले आहे. या घटनेनंतर पुण्यात पोलिसांनी कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात केला असून पोलिसांकडून घटनेचा कसून तपास सुरू आहे. मात्र, शरद मोहोळ हा हिंदुत्ववादी होता, माझा मित्र होता, असे म्हणत तेलंगणातील भाजपा नेते आणि आमदार राजा सिंह यांनी शरद मोहोळची आठवण सांगितली.

शनिवारी सोलापूरात हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चानंतर आयोजित सभेत बोलताना तेलंगणाचे आमदार टी. राजा सिंह ठाकूर यांनी शरद मोहोळची आठवण सांगितली, तसेच शरदभाऊ माझा मित्र होता, असेही ते म्हणाले.

“जेव्हा पुण्याचा विषय निघाला, तेव्हा एक वाईट बातमी ऐकायला मिळाली. मी सासवडला जाणार होतो, तेव्हा मला समजलं की माझ्या मित्राची हत्या करण्यात आली. शिर्डीच्या श्रीरामपूरमध्ये शरद मोहोळ आणि मी यांनी धर्मसभेला संबोधित केलं होतं. ज्या व्यक्तीने स्वतःचं आयुष्य धर्म, देश आणि गोरक्षासाठी व्यतीत केलं. ज्या व्यक्तीने तुरुंगात एका दशतवाद्याला सदगुरुकडे पाठवलं होतं. त्या शरदभाऊंना आपल्या काही गद्दारांनी ठार मारलं,” असे आमदार राजासिंह यांनी म्हटलं.

“शरद मोहोळ याची पत्नीही हिंदुवादी आहे, त्या आज आपल्या मंचावर येणार होत्या. मात्र, ही दुःखद घटना घडली.

आपण सर्वजण मिळून त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करू, असे म्हणत आमदार राजासिंह यांनी शरद मोहळ यांना सोलापूर श्रद्धांजली वाहिली. आई तुळजाभवानी मातेनं शरदभाऊंना पुन्हा या भूतलावावर जन्म द्यावा, कुणाच्या घरी त्यांचा जन्म व्हावा आणि त्यांचं अर्धवट राहिलेलं हिंदुत्त्वाचं काम पूर्ण करावं,” अशी प्रार्थनाही त्यांनी तुळजाभवानी चरणी करत असल्याचं म्हटलं.

दरम्यान, या खून प्रकरणात आत्तापर्यंत पोलिसांनी साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर, विठ्ठल किसन गांदले, अमित मारुती कानगुडे, नामदेव महिपत कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, अॅड. रवींद्र वसंतराव पवार आणि अॅड. संजय रामभाऊ उडान यांना अटक झाली. वकिलांना ८ व बाकी आरोपींना १० जानेवारीपर्यंत पर्यंत पोलिस कोठडी मिळाली.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments