Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज माझ्याकडे मुख्यमंत्रिपद नाही, पण मी शब्द देतो की.... उद्धव ठाकरेचं आंदोलकांना काय...

माझ्याकडे मुख्यमंत्रिपद नाही, पण मी शब्द देतो की…. उद्धव ठाकरेचं आंदोलकांना काय आश्वासन?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. त्यांनी विधानभवनावर मोर्चा काढला आहे. या आंदोलनात उद्धव ठाकरे सहभागी झाले.

नागपुरात होत असलेल्या या आंदोलनाच्या ठिकाणी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. जुन्या पेन्शन योजनेसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना उद्धव ठाकरे यांनी संबोधित केलं.

दीड महिन्यापूर्वी तुमचे नेते मला भेटले. त्यांनी बोलावल्यानंतर मी आलो. पण आज जर मी मुख्यमंत्री असतो तर तुम्हाला हा मोर्चा काढावाच लागला नसता, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सरकार घोषणा करतं. पण कागदावरच्या योजना जमीनीवर आणण्याचं काम प्रशासन करत असतं. पण या महत्वाच्या घटकालाच आपल्या न्याय हक्कांसाठी आक्रोश करावा लागत असेल, तर सरकारला टेन्शन देण्याची गरज आहे, असं ठाकरे म्हणाले.

माझा पक्ष चोरला, निवडणूक चिन्ह चोरलंय… मी आता मुख्यमंत्री नाही. माझ्याकडे काही नाही. तरीही तुम्हाला ताकद द्यायला मी आलोय. मी शब्द देतो, शिवसेना तुमच्या आंदोलनाच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्यासोबत असेल, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments