इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यातील सहकारनगर येथे एक चोरीची घटना घडली आहे. चोरट्यांनी एका दुचाकीस्वार महिलेकडील एक लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी हिसकावून घेतल्याची घटना घडली आहे. याबाबत एका महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, याप्रकरणी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यातदार महिला या तळजाई वसाहत येथे वास्तव्यास आहेत. महिलेने बँकेतून एक लाखांची रोकड काढून ती एका पिशवीत ठेवली होती. त्यानंतर त्या बुधवारी (5 मार्च) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास सहकारनगर भागातून दुचाकीवरुन आपल्या मुलासोबत जात होत्या.
दरम्यान, सहकारनगर परिसरातील विद्या विकास शाळेजवळ दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या हातातील पिशवी हिसकावून पळून गेले. त्या पिशवीत एक लाख रुपयांची रोकड होती. पिशवी हिसकावल्यानंतर महिलेने आरडाओरडा केला. तेंव्हा चोरटे दुचाकीवरून पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड घटनास्थळी पोहचले. सध्या पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासत आहेत. याप्रकारणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील करत आहेत.