इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
नवी दिल्ली: केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनीकर्करोगावरील लसीबाबत मोठी घोषणा केली आहे. महिलांच्या संबंधित कॅन्सर आजाराची लस आगामी पाच ते सहा महिन्यांत उपलब्ध होणार असल्याचे ते म्हणाले आहेत.
अधिक माहिती अशी की, कॅन्सर आजाराची लस ९ ते १६ वर्षे वयोगटातील मुलींना दिली जाणार आहे. देशात कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या समस्येला सामोरे जाण्यासाठी सरकार नवनवीन निर्णय घेत आहे. त्यामुळे सरकारकडून कर्करोगाची लस पाच ते सहा महिन्यांत उपलब्ध होणार असल्याचे म्हटले आहे.
‘डे केअर कॅन्सर सेंटर’ तयार केले जाणार
या मध्ये ३० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांची रुग्णालयात तपासणी केली जाईल. कर्करोग लवकर ओळखण्यासाठी ‘डे केअर कॅन्सर सेंटर’ तयार केले जाणार आहेत. या समस्सेला हाताळण्यासाठी कर्करोगाच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या औषधांवरील सीमा शुल्कही माफ करण्यात आले आहे.
केंद्रीय आयुष मंत्री म्हणाले..
या बाबत केंद्रीय आयुष मंत्री म्हणाले, कर्करोग लसीवरील संशोधनाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे आणि तिच्या चाचण्या सुरू आहेत. देशात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढली असून केंद्र सरकारने या समस्येचे निरसन करण्यासाठी पावले उचलली आहेत.