Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज महिन्याभरापासून प्रतिक्षा; अखेर दहिहंडीपासून पुणे जिल्ह्यात पावसाची जोरदार सलामी

महिन्याभरापासून प्रतिक्षा; अखेर दहिहंडीपासून पुणे जिल्ह्यात पावसाची जोरदार सलामी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : गेले कित्येक दिवस प्रतिक्षा असलेल्या मॉन्सूनची पुन्हा सुरुवात झाली असून भीमा, कृष्णा खोऱ्यात पावसाने गुरुवारी सायंकाळपासून जोरदार सलामी दिली आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस पडताना दिसत आहे.

पुणे जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून पावसाची प्रतिक्षा होती. त्यातून धरणांमधील पाणीसाठा कमी होऊ लागला होता. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधील धरणे पूर्ण भरलेली नसल्याने खालच्या उजनी धरणातील पाणीसाठा वाढू शकत नव्हता. सर्वांना पावसाची प्रतिक्षा असताना गुरुवारी सायंकाळपासून पावसाचे पुनरागम झाले आहे. पवना धरणाच्या परिसरात गेल्या २४ तासात ७३ मिमी पावसाची नोंद झाली असून धरण १०० टक्के भरले आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक धरण क्षेत्रात जोरदार पावसाची सुरुवात झाली आहे. निमगिरी येथे १६६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत नारायणगाव ६९, खेड ४१.५, राजगुरुनगर २५.५, तळेगाव २३.५, चिंचवड २२, ढमढेरे १८, आंबेगाव १६, लवळे १५.५, पाषाण १४.५, भोर ११.५, एनडीए ११, शिवाजीनगर १०.५, वडगाव शेरी १०.५, लवासा ९.७ कोरेगाव पार्क ९ मिमी पासाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यातील धरण क्षेत्रात गेल्या २४ तासात पडलेला पाऊस व धरणातील पाणीसाठा (टक्केवारी)

माणिकडोह – ६० मिमी, ६३ टक्केपिंपळगाव जोगे : ४० मिमी, ६८ टक्के

येडगाव : ४२ मिमी, १९ टक्के वडज : ४३ मिमी, ९१ टक्के

डिंबे : ५६ मिमी, ९२ टक्के

घोड : ४ मिमी, १९ टक्के

विसापूर : ७ मिमी, २२ टक्के

चिल्हेवाडी : २६ मिमी, ५९ टक्के कळमोडी : ३२ मिमी, १०० टक्के

चासकमान : २४ मिमी, ९८ टक्के

भामा आसखेड : २० मिमी, ८९ टक्के

वडिवळे : ६८ मिमी, १०० टक्के

आंद्रा : ३० मिमी, ९९ टक्के

पवना : ७३ मिमी, १०० टक्के

कासारसाई : २२ मिमी, १०० टक्के

मुळशी : ३२ मिमी, ८७ टक्के

टेमघर : १० मिमी, ८० टक्के

वरसगाव : ४ मिमी, ९९ टक्के

पानशेत : ५ मिमी, ९९ टक्के

खडकवासला : १ मिमी, ४५ टक्के

गुंजवणी : ३ मिमी, ८८ टक्के निरा देवघर १ मिमी, ९९ टक्के

भाटघर : २ मिमी, ९५ टक्के

वीर : ० मिमी, ५९ टक्के

नाझरे : ० मिमी ०० टक्के पाणीसाठा

उजनी : ३ मिमी, १८ टक्के

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments