इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मुंबई : महाशिवरात्रीनिमित्त बुधवारी (दि.26) शेअर बाजारात सुट्टी असणार आहे. BSE वर कोणताही व्यवहार होणार नाही. तत्पूर्वी मंगळवारी शेअर बाजारात मोठी घडामोड दिसून आली. सुट्टीपूर्वी मंगळवारी शेअर बाजारात किंचित वाढ दिसून आली. बीएसई सेन्सेक्सने मंगळवारच्या मागील व्यापार सत्रापासून घसरणीचा कल संपवला आणि बेंचमार्क निर्देशांक 147 अंकांनी वधारला. बीएसई सेन्सेक्स 0.20 टक्क्यांच्या वाढीसह 74,602.12 अंकांवर बंद झाला.
आर्थिक आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदीमुळे बाजारात तेजी दिसून आली. 30 शेअर्सवर आधारित बीएसई सेन्सेक्स 147.71 अंकांच्या वाढीसह 74,602.12 अंकांवर बंद झाला. व्यापारादरम्यान तो 330.67 अंकांवर चढला होता. सेन्सेक्समधील 17 शेअर्स नफ्यात तर 13 तोट्यात होते. एनएसईच्या निफ्टीची घसरण सहाव्या दिवशीही कायम राहिली आणि तो 5.80 अंकांनी किरकोळ घसरला आणि 22,547.55 अंकांवर बंद झाला.
दरम्यान, अमेरिका आणि आशियातील इतर बाजारपेठेतील कमकुवत कल पाहता, गुंतवणूकदार जोखीम घेणे टाळत आहेत. सेन्सेक्स समभागांमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, झोमॅटो, नेस्ले, बजाज फिनसर्व्ह, मारुती आणि टायटन हे प्रमुख शेअर्स वधारले. तर दुसरीकडे, तोट्यात असलेल्या समभागांमध्ये सन फार्मा, पॉवरग्रिड, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टेक महिंद्रा, एशियन पेंट्स आणि टाटा मोटर्स यांचा समावेश असल्याचे दिसून आले.