Tuesday, September 10, 2024
Homeक्राईम न्यूजमहावितरणमध्ये विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू; सासवड येथील घटना

महावितरणमध्ये विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू; सासवड येथील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

सासवड : सासवड येथे महावितरणमध्ये डीपी चे ऑइल बदली करताना विजेचा धक्का बसून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुनीर उर्फ भैया पापा भाई मनेर (वय-27 सिद्धिविनायक सोसायटी, सोनोरी रोड सासवड) असं मरीतु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना आज (दि. २६) सासवड येथील महावितरण कार्यालयात घडली.

मुनीर उर्फ भैया पापा भाई मनेर हे सासवड येथे राहत होते. ते सासवड येथील महावितरणमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर ऑक्टोबर 2018 मध्ये कामावर रुजू झाले होते. दरम्यान, आज ते एम एस सी बी बोर्ड मध्ये डीपीचे ऑइल बदली करत असताना मोटरच्या कनेक्शनच्या सध्याच्या स्थितीमध्ये पावसामुळे चिखल झाल्याने मनेर यांना विजेचा धक्का बसला.

त्या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून मनेर यांना मृत घोषित केले. याबाबत पोलीस कर्मचारी अमोल लडकत यांनी सासवड पोलीस ठाण्यात नोंद करून घेतली आहे. पुढील तपास सासवड पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments