Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजमहावितरणच्या महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने वारः उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, बारामतीमधील घटना; लाईट बिल...

महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने वारः उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, बारामतीमधील घटना; लाईट बिल जास्त आल्याने ग्राहक संतापला

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

बारामती तालुक्यातील मोरगाव येथे महावितरण कंपनी कार्यालयात एका महिलेवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या एकाने येथील महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. तर यात सदर महिला कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू

लाईट बिल जास्त येत आहे, त्यामुळे मीटर चेक करावा अशा आशयाची तक्रार महावितरणकडे हल्ला करणाऱ्या व्यक्तीने केली होती. मात्र, महावितरणने कोणतीही कार्यवाही न केल्याने अभिजीत पोटे नामक व्यक्तीने महिला कर्मचाऱ्यांच्या डोक्यात कोयता मारला. दरम्यान, कोयत्याचा गंभीर वार बसल्याने उपचारादरम्यान, महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. बारामतीमधील घटनेनंतर महिलेला उपचारासाठी पुण्याला नेण्यात येत होते. मात्र, त्यांचा मृत्यू झाला.

खूनाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता

बारामती महावितरण विभागातील घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव रिंकू पिटे असे आहे. या घटनेनंतर सदर महिलेला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी, प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार महिलेला पुढील उपचारासाठी पुण्यात हलवण्यात आले. मात्र, पुण्यात उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान, याप्रकरणी बारामतीतील सुपे पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध कलम 307 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. पण, महिलेचा मृत्यू झाल्यामुळे आता याप्रकरणी 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

हल्लेखोराला पोलिसांनी केली अटक

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून आरोपीला ताब्यात घेणयात आलं आहे. दुचाकीवरुन आलेल्या इसमाने टोकाची भूमिका घेत थेट महिला कर्मचाऱ्याच्या डोक्यात कोयताच घातल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी कसून तपास करावा अशी मागणीही कर्मचाऱ्यांनी केली आहे.

एक वर्षाचं बाळ पोरकं झालं

मुळच्या लातूर जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या रिंकू गोविंदराव बनसोडे ह्या दहा वर्षापूर्वी 2013 मध्ये महावितरणच्या सेवेत दाखल झाल्या होत्या. गेल्या 10 वर्षापासून त्या मोरगाव येथेच कार्यरत होत्या. नोकरीनंतर रिंकू बनसोडे यांचा विवाह झाला. त्यांना एक वर्षाचा मुलगा आहे. दहा दिवसांची सुटी संपल्यानंतर त्या मोरगाव कार्यालयात कामावर रुजू झाल्या होत्या. त्यांच्या जाण्याने एक वर्षांच बाळ आईपासून पोरकं झालं आहे.

570 रुपयांच्या बिलासाठी हल्ला?

हल्ला केलेल्या आरोपीचे वीजबिल रत्नाबाई सोपान पोटे या नावाने आहे. त्या वीजबिलाचा ग्राहक क्रमांक 186640053549 असा असून, चालू एप्रिल 2024 या महिन्याचे 63 युनीट वीजवापराचे वीजबिल 570 रुपये इतके आहे. मागील 12 महिन्याचा वापर तपासला असता तो 40 ते 70 युनिटमध्ये आहे. थकबाकी नाही, उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे चालू महिन्यात वापर 30 युनीटने वाढला व त्याचे बील 570 आले होते. हे बील वापरानुसार व नवीन दरानुसार योग्यच आहे. तसेच सदर ग्राहकाची वीजबिलाबाबत कोणतीही लेखी अथवा ऑनलाईन तक्रार नोंदवलेली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments