इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या अवकाळी पावसामुळे आणि विजांच्या कडकडाटाने नागरिकांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे. अशातच आता सोलापूर शहरातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. विजेचा धक्का बसल्याने नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजनंदिनी अणय कांबळे असे मृत पावलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. शहरातल्या कोनापुरे चाळ परिसरात काल (8 एप्रिल) रात्री 9 च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. संध्याकाळी झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे विजेची तार तुटून लोखंडी जिन्यात तिचा विद्युत प्रवाह उतरला. राजनंदिनी हिचा या लोखंडी जिन्याला स्पर्श झाल्याने ती जागीच बेशुद्ध झाली. त्यानंतर तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान महावितरणच्या हलगर्जीपणामुळे या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप या परिसरातील नागरिक करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी संतप्त होत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.