Tuesday, April 29, 2025
Homeक्राईम न्यूजमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात विविध पदांची भरतीः कसा कराल अर्ज?

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात विविध पदांची भरतीः कसा कराल अर्ज?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. सांगली येथे ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळात समुपदेशक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. समुपदेशक पदासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ही नेमणूक मानद तत्वावर होणार आहे. १ वर्षासाठी ही भरती करण्यात येणार आहे. एसटी महामंडळात एकूण २ रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युतर पदवी प्राप्त केलली असावी. मानसशास्त्र विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असावे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला शासकीय/निमशासकीय / खाजगी संस्थांमध्ये कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव असावा.

सांगली येथे ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करावा लागणार आहे. यासाठी तुम्हाला पेपरवर अर्ज लिहावा त्यावर तुमचा फोटोदेखील चिटकवावा, यानंतर अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखल, शैक्षणिक प्रमाणपत्र हे सर्व कागदपत्रे जोडावे. हा अर्ज तुम्ही २१ एप्रिल २०२५ पर्यंत अर्ज करायचा आहे. तुम्हाला विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय, शास्त्री चौक, सांगली-कोल्हापूर रोड, सांगली, पिन ४१६४१६ येथे अर्ज पाठवायचा आहे. या नोकरीसाठी लवकरात लवकर अर्ज करावेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments